AAP delhi mayor
AAP delhi mayor esakal
देश

AAP : हायकोर्टाचा 'आप'ला झटका; स्थायी समिती सदस्यांच्या फेरनिवडीवर पायबंद

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः दिल्ली महानगर पालिकेमध्ये काल हाणामारी झाली. स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि आम आदमी पार्टीचे सदस्य एकमेकांना भिडले. त्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याचसंबंधी आज दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीच्या माहपौरांना तंबी दिली आहे.

काल दोन्ही गटांचे नगरसेवक एक-दुसऱ्याला बुक्क्यांनी मारहाण करत होते, एकमेकांचे केस ओढत होते. स्टँडिंग कमिटी निवडणुकीसाठी मतदान झालं. या निवडणुकीदरम्यान थेट मारहाण झाली. यावेळी दुसऱ्यांदा काऊंटिंगची मागणी करण्यात आली होती. याच मुद्द्यावरुन भाजप आणि आपचे नगरसेवक समोरासमोर आले. फेरमतमोजणीला महापौरांनी नकार दिल्याने हा राडा झाला.

दिल्ली महापालिकेमध्ये काल झालेल्या वादावादीनंतर स्थायी समितीची निवडणूक पुन्हा करण्याचा मुद्दा उपस्थित झाला. हे प्रकरण आज कोर्टा गेलं. हायकोर्टात सुनावणी झाल्यानंतर स्थायी समितीच्या नवीन निवडीसाठी कोर्टाने पायबंद घातला आहे.

भाजपच्या नगरसेवकांनी यासंबंधी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने एलजी, महापौर, एमसीडी यांना नोटीस जारी केली आहे. या प्रकरणी आता २७ मार्च रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

माजी महापौर आणि विद्यमान नगरसेवक कमलजीत शेहरावत यांनी आरोप केला की, नवनियुक्त महापौर शैली ओबेरॉय ह्या दिल्ली निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांचं आणि निगम सचिव कार्यालयातील अधिकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत नव्हत्या. अधिकाऱ्यांनी मतगणना केली परंतु ओबेरॉय काहीही ऐकून घेण्याच्या मनःस्थिती नव्हत्या. त्यामुळे भाजप नगरसेवक संतापले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

Heeramandi The Diamond Bazar : भन्साळींच्या भाचीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; 'या' अभिनेत्रीने ट्रोलर्सला सुनावले खडेबोल

Panchayat 3: प्रमोशनची हटके पद्धत; भाजी मंडईतील दुधीभोपळ्यावर 'पंचायत'चं नाव, व्हिडीओ व्हायरल

Akshaya Tritiya 2024: अक्षय तृतीयेला सोन खरेदीवर विशेष ऑफर! मेकिंग चार्जेसवर ज्वेलरी ब्रँड देत आहेत खास सवलत

Latest Marathi News Update: लोकसभा निवडणुकीत नाशिकमध्ये 31 तर दिंडोरीत 10 उमेदवार रिंगणात

SCROLL FOR NEXT