grosary shop 
देश

Crime: 'तू दुसऱ्याच्या दुकानातून सामान कसा खरेदी केलास?'; किराणा दुकानदाराने ग्राहकाचा केला खून

Crime News Delhi: आपल्या ग्राहकाचा खून केला आहे. ग्राहकाने दुसऱ्याच्या दुकानातून सामान खरेदी केले होते. यामुळे त्याला राग आला होता. त्यानंतर त्याने आपल्या मुलाच्या मदतीने ग्राहकाची हत्या केली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- दिल्लीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. किराणा दुकानाच्या एका मालकाने आपल्या ग्राहकाचा खून केला आहे. ग्राहकाने दुसऱ्याच्या दुकानातून सामान खरेदी केले होते. यामुळे त्याला राग आला होता. त्यानंतर त्याने आपल्या मुलाच्या मदतीने ग्राहकाची हत्या केली आहे. 'आज तक' ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर पश्चिम दिल्लीतील शकूरपूरमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितलं की, किराणा दुकान मालकाने आपल्या मुलांच्या मदतीने ३० वर्षीय व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर कात्री त्याच्या मानेत खुपसली. यामुळे तरुणाचा मृत्यू झाला आहे.

मृत तरुणाचे नाव विक्रम कुमार असल्याचं कळतंय. पोलिसांनी लोकेश गुप्ता आणि त्याचे दोन मुलं प्रियांश आणि हर्ष यांना अटक केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे. ३० जून रोजी ही घटना घडली आहे.

नेमकं काय झालं?

दिल्लीतील शकूरपूर येथे गुप्ताचे एक किराणा दुकान आहे. विक्रम कुमार हा त्याचा नियमित ग्राहक होता. एक महिन्यापूर्वी विक्रम कुमार याने काही कारणामुळे त्याने दुसऱ्या किराणा दुकानातून सामान खरेदी करण्यात सुरुवात केली. गुप्ताच्या दुकानात त्याने येणे बंद केले. त्यामुळे दुकानदार गुप्ता नाराज झाला होता आणि त्याला राग पण आला होता. रविवारी १० वाजता गुप्ता आणि विक्रम कुमार यांच्यामध्ये याच मुद्द्यावरून भांडण झाले.

पोलिसांनी सांगितल्यानुसार, भांडण टोकाला गेले. गुप्ता ने भांडणामध्ये आपल्या मुलांना देखील बोलावले. यावेळी गुप्ता आणि त्याच्या दोन मुलांनी लोखंडी रॉडने विक्रम कुमार याला मारहाण सुरू केली. गुप्ताने कात्री काढली अन् विक्रम कुमारच्या गळ्यावर मारली. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT