UPSC Coaching Centre Deaths Latest News Update 
देश

UPSC Coaching Centre Deaths : तीन विद्यार्थी दगावले त्या कोचिंग सेंटरची फी माहितेय? जाणून घ्या ७० वर्षांहून जुन्या संस्थेचा इतिहास

Delhi Coaching Centre Tragedy : दिल्लीत नागरी सेवा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणाऱ्या राऊज आयएएस स्टडी सेंटरमध्ये तळघरात पाणी शिरल्याने दोन विद्यार्थिनी आणि एका विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे.

रोहित कणसे

दिल्लीच्या जुन्या राजेंद्र नगर भागातील राऊज आयएएस स्टडी सेंटर सध्या चर्चेत आहे. हे सेंटर चर्चेत येण्याचं कारण म्हणजे या कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी घुसून तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर कोचिंग सेंटरविरोधात अनेक आरोप केले जात आहेत. तसेच विद्यार्थ्यंकडून देखील आंदोलन करत कठोर कारवाईची मागणी केला जात आहे. दरम्यान आता या कोचिंग सेंटरबद्दल काही महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.

इतिहास काय आहे?

या कोचिंग सेंटरच्या अधिकृत वेबसाइटनुसार, ही संस्था ७० वर्षांपासून सेवा देत आहे. तसेच त्यांचा दावा आहे की, १९५३ पासूनच्या सर्व ब्यूरोक्रॅट्सपैकी एक तृतीयांश अधिकारी त्यांच्याकडे शिकलेले आहेत. या संस्थेची सुरूवात डॉक्टर एस राव यांनी केली होती. येथे आता नागरी सेवा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. राव यांना काही विद्यार्थ्यांनी पॉलिटिकल सायन्स शिकवण्याची विनंती केली होती, त्यानंतर १९५३ मध्ये हे सेंटर सुरू करण्यात आले.

१९५३ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेच्या सध्या दिल्ली, बंगळुरू आणि जयपूर येथे देखील शाखा आहेत. कंपनीच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार कंपनीत ५१-२०० कर्मचारी काम करतात. सध्या कंपनीचे सीईओ अभिषेक गुप्ता आहेत, ज्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केले आहे. अभिषेक गुप्ता २००९ पासून या संस्थेचे सीईओ आहेत.

फी किती घेतात?

या कोचिंग सेंटरमध्ये घेतल्या जाणाऱ्या फीबद्दल सांगायचे झाल्यास, त्यांच्या अधिकृत वेबसाइटनुसार जनरल स्टडीजच्या ऑफलाइन फाउंडेशन कोर्सची फी एक लाख ७५ हजार रुपये इतकी आङे. यामध्ये लाइव्ह ऑनलाइन कोर्सची फी ९५ हजार ५०० रुपये आहे. तर ऑप्शनल मेन्स फाउंडेशन कोर्स फी ५५ हजार ५०० रुपये आहे. ज्यामध्ये ऑनलाइन कोर्सची पी ४५ हजार ५०० रुपये आहे. तर सीसॅट फाउंडेशन कोर्सची फीस १८ हजार ५०० रुपये आहे. यामध्ये ऑनलाइन कोर्सची फी १२ हजार ५०० रुपये आहे.

नेमकं काय झालं होतं?

दिल्लीत झालेल्या मुसळधार पावसामुळे जुन्या राजेंद्र नगर भागात मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यावेळी याच भागात असलेल्या राऊज आयएएस स्टडी सेंटरच्या तळघरात असलेल्या ग्रंथालयामध्येही पाणी शिरणे सुरू झाले. याठीकाणी अभ्यास करत असलेले काही विद्यार्थी या तळघरात अडकून पडले. या तळघरात अवघ्या काही मिनिटातच तब्बल बारा फुटापर्यंत पाहणी भरल्याने या विद्यार्थ्यांना बाहेर पडता आले नाही.

यामुळे उत्तर प्रदेशातील श्रेया यादव, तेलंगणातील तान्या या दोन विद्यार्थिनी तसेच केरळमधील नेविन डॅल्विन या विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर दिल्ली सरकारने या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवून कोचिंग सेंटरचे मालक अभिषेक गुप्ता आणि समन्वयक देशपालसिंह यांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात आणखी पाच जणांना अटक करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पाऊस! पवई तलाव ओव्हरफ्लो, ७ जलाशयातील पाणीसाठ्याबाबत मोठी अपडेट समोर

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

Jagannath Puri Rath Yatra 2026: कधी आहे जगन्नाथ पुरी रथयात्रा 2026? जाणून घ्या योग्य तारीख, महत्त्व आणि परंपरा

SCROLL FOR NEXT