esakal

देश

Delhi Red Fort Explosion : राजधानी दिल्ली हादरली! लाल किल्ला परिसरात कारमध्ये भीषण स्फोट ; तीन गाड्यांना आग

Massive explosion near Delhi Red Fort : प्राप्त माहितीनुसार हा स्फोट मेट्रोस्टेशन जवळील गेट नंबर एक जवळ हा स्फोट झाला आहे.

Mayur Ratnaparkhe

Massive Explosion Near Red Fort: राजधानी दिल्लीत लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट झाला आहे. प्राप्त माहितीनुसार हा स्फोट मेट्रोस्टेशन जवळील गेट नंबर एक जवळप हा स्फोट झाला आहे. स्फोटानंतर परिसरातील तीन गाड्यांना आग लागली आहे.

प्राप्त माहितीनुसार, या स्फोटात काहीजण जखमी देखील झाले आहेत. तर स्फोट झाल्यानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि लोकांची पळापळ सुरू झाली आहे. साधारण पावणेसात वाजता हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे.

या स्फोटाच्या घटनेनंतर दिल्लीत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. अशीही माहिती समोर येत आहे की, या स्फोटात एका जणाचा मृत्यू झाला आहे. लाल किल्ला संपूर्ण परिसरात कडेकडोट बंदोबस्त तैनात आहे. एनएसजी, एएनआय आणि सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याशिवाय, हा स्फोट दहशतवादी हल्ला आहे का, या बाजूनेही तपास सुरू झालेला आहे. तर एका इको गाडीत हा मोठी स्फोट झाल्याची माहिती समोर आलेली आहे. फॉरेन्सिक टीम देखील घटनास्थळी दाखल झाली असून, स्फोट नेमका कशामुळे झाला याचा शोध घेतला जात आहे. अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

८ वर्षांत २४८ कोटी रुपये खर्च, मुंबईतील उड्डाणपुलावर भूकंपासारख्या भेगा; ३ महिन्यांत तिसऱ्यांदा वादाच्या भोवऱ्यात

Manoj Jarange Patil: ‘मागण्या मान्य करा, नाहीतर उडी घेऊ’; लातूरमध्ये मराठा तरुणांचा टोकाचा इशारा

Pune News : पुणे विद्यापीठासह तीन विद्यापीठांत आता ‘कुलपती पदक’; राज्यपालांच्या हस्ते विद्यापीठांना प्रत्येकी १० लाख रुपयांचा धनादेश

Marathi News Live Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

Pune News : तंत्रशिक्षण अभ्यासक्रमांच्या संस्थास्तरीय फेऱ्यांसाठी निरीक्षकाची नियुक्ती होणार; त्रुटी आढळल्यास संस्थेवर कारवाई

SCROLL FOR NEXT