

Matt Henry | India vs New Zealand 4th ODI
Sakal
New Zealand vs India, 4th ODI : भारतीय संघाला शुक्रवारी (१३ नोव्हेंबर) माऊंट मौंगानुई येथे न्यूझीलंडविरुद्ध २४४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. हा भारताचा धावांच्या तुलनेतील वनडेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पराभव ठरला.
न्यूझीलंडने पहिल्या दोन पराभवानंतर या सामन्यातून मालिकेत पुनरागमन केले असून आता त्यांना मालिका बरोबरीत राखण्याची संधी आहे. न्यूझीलंडच्या विजयात अनुभवी वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने (Matt Henry) मोलाचा वाटा उचलला. त्याने दुखापीतनंतर या मालिकेत पुनरागमन केले.