Delhi esakal
देश

Delhi : सायबर सुरक्षा मजबूत करा,देशातील सर्व बँकांना केंद्रीय अर्थमंत्रालयाचे निर्देश

बॅंकांचे डिजिटायझेशन वाढत असले तरी त्यात काही धोकेही आहेत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : युको बॅंकेने आपल्या काही खातेधारकांच्या खात्यात ८२० कोटी रुपये वर्ग केल्याची चूक केली होती. या पार्श्वभूमीवर सायबर सुरक्षा मजबूत करण्याचे निर्देश अर्थमंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना दिले आहेत.

‘‘डिजिटल व्यवहारांच्या संदर्भातील यंत्रणा आणि प्रक्रियेचा आढावा घेऊन सायबर सुरक्षा मजबूत करावी. भविष्यात सायबर हल्ले आणि चुका होऊ नयेत, यासाठी आतापासूनच आवश्यक ती काळजी घ्यावी,’’ असे अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक बॅंकांना सांगितले आहे. बॅंकांचे डिजिटायझेशन वाढत असले तरी त्यात काही धोकेही आहेत. अर्थ मंत्रालय आणि आरबीआयकडून सार्वजनिक बँकांना या धोक्यांची जाणीव करून दिली जात आहे.

काही दिवसांपूर्वी युको बॅंकेने आपल्या खातेधारकांच्या खात्यात ‘आयएमपीएस’द्वारे ८२० कोटी रुपये वर्ग केले होते. तांत्रिक चुकीमुळे ही घटना घडल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. ८२० कोटींपैकी ६४९ कोटी रुपये परत मिळविण्यात युको बँकेला यश आले असून उर्वरित रक्कम परत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी बॅंकेकडून तपास संस्थांना विचारणा करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rupee vs Dollar : रुपया रोज का घसरतोय? डॉलर एवढा का महागतोय? त्यामुळे सोन्याचे भाव का वाढतात? जाणून घ्या पैशाच्या ABCD मागचं सत्य

Pune News : 'मुलगी माझी नाही' तिचा डीएनए तपासावा; पालकत्व तपासणीसाठी पित्याने केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला!

IND vs SA 3rd ODI : छोटी हाईट, वातावरण ताईट! Temba Bavuma ने तिसऱ्या वन डेत रचला इतिहास; पहिला फलंदाज ज्याने...

IndiGo Crisis: हजारो प्रवाशांना दिलासा! परतफेड ७ डिसेंबरपर्यंत पूर्ण करा अन्...; इंडिगोला सरकारचा अल्टीमेटम

Latest Marathi News Live Update : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विजय थलापतीने केले अभिवादन

SCROLL FOR NEXT