Delhi Waqf Board Scam case ED Arrests AAP Leader Amanatullah Khan  Marathi Latest News
Delhi Waqf Board Scam case ED Arrests AAP Leader Amanatullah Khan Marathi Latest News  
देश

Delhi Waqf Board Scam : 'आप'ला पुन्हा मोठा धक्का! वक्फ बोर्ड घोटाळा प्रकरणी अमानतुल्लाह खान यांना अटक

सकाळ वृत्तसेवा

Delhi Waqf Board Scam : वक्फ बोर्ड घोटाळ्याशी संबंधित हवाला व्यवहार प्रकरणी आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांना सक्तवसुली संचलनालयाने गुरुवारी रात्री अटक केली. नऊ तासांच्या चौकशीनंतर खान यांना अटक झाली, हे विशेष. अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने खान यांचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळून लावत त्यांना ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले होते.

वक्फ बोर्ड घोटाळा प्रकरणात ईडीने खान यांच्या तीन सहकाऱ्यांविरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते. दोषारोप पत्रात अद्याप खान यांचे नाव सामील नाही. दोषारोपपत्र दाखल असलेल्यांत जावेद सिद्दीकी, दाउद नासिर आणि कौसर सिद्दीकी यांचा समावेश आहे. दिल्ली वक्फ बोर्डाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना खान यांनी नियमांचे उल्लंघन करीत 32 लोकांची भरती केल्याचा तपास संस्थांचा आरोप आहे. वक्फ बोर्डाची संपत्ती भाड्याने दिल्याचा तसेच बोर्डाच्या निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे.

खान हे सकाळी अकरा वाजता ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्यांना अटक केली. अमानतुल्लाह यांच्या ठिकाणांवर तपास संस्थांनी छापे टाकत कागदपत्रे ताब्यात घेतली होती. चौकशीसाठी हजर रहावे, असे सांगत ईडीने त्यांना सहावेळा समन्स बजावले होते. मात्र दरवेळी खान यांनी समन्सकडे दुर्लक्ष केले होते. या पार्श्वभूमीवर कनिष्ठ न्यायालयाने त्यांच्याविरोधात नोटीस जारी केली होती.

खान यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यास परवानगी दिली जावी, असे सांगत ईडीने न्यायालयात याचिका दाखल केल्यावर खान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दिला होता. तथापि चौकशीसाठी ईडीसमोर उपस्थित राहण्याचे निर्देश न्यायालयाने खान यांना दिले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT