Prime Minister Narendra Modi sakal
देश

PM Narendra Modi: देशातील उद्योगांनी संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

हवाई दलाच्या १४ व्या एरो इंडियाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते

अक्षता पवार

Aero India 2023: देशातील खासगी उद्योगांनी संरक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याची गरज आहे. या अमृतकाळात देशात संरक्षण क्षेत्राचे महत्त्व वाढले असून या क्षेत्राला चांगले दिवस आले आहेत. या संधीचा फायदा उद्योगांना घेता येईल. असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

भारतीय हवाईदलातर्फे कर्नाटकातील येलंका येथे आयोजित १४ व्या एरो इंडिया या कार्यक्रमाचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते पार पडले.

या प्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरार्दित्य सिंदिया, कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, कर्नाटकची मुख्य सचिव वंदिता शर्मा, सैन्यदल प्रमुख जनरल मनोज पांडे, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल विवेक चौधरी, नौदल प्रमुख अडमिरल हरी कुमार आदी उपस्थित होते.

मोदी म्हणाले, "ज्या देशात मागणी, अनुभव आणि क्षमता अधिक असते, त्या देशात उद्योग वाढतो. अशी स्थिती आता भारतात निर्माण होत आहे. त्यामुळे उद्योगांनी संरक्षण क्षेत्रात सहभाग वाढवावा. स्वदेशी व नावीन्यपुर्ण तंत्रज्ञान विकसित करून आधुनिक उत्पादने तयार करत भारताने जगभरात आपली नवी ओळख निर्माण केली आहे.

तेजस सारखे स्वदेशी विमान व आयएनएस विक्रांत हे त्याचेच उदाहरण आहे. केवळ निर्मितीच नाही तर आपल्या उत्पादनांची क्षमता पाहता, मित्र देशांचा या उत्पादनांच्या प्रति विश्वास वाढत आहे. परिणामी परदेशातील उद्योग आणि भारतातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात सामंजस्य करार होत आहेत."

संरक्षण क्षेत्राचे सामर्थ्य दर्शविणारा कार्यक्रम :

या कार्यक्रमाच्या माध्यमातून बंगळूरचे आकाश हे नव्या भारताच्या सामर्थ्याचे साक्षीदार ठरत आहे. देशाचे संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर भारतच्या दिशेने काम करत असून त्या कामाची पावती आपल्याला या पाच दिवसांच्या कार्यक्रमातून दिसून येईल.

तसेच या माध्यमातून लष्करी विमाने, हेलिकॉप्टर, उपकरणे आणि नवीन युगातील एव्हीओनिक्सच्या निर्मितीसाठी उदयोन्मुख केंद्र म्हणून भारताची प्रतिमा समोर येईल.

एरो इंडिया हा फक्त विमानांची कवायती सादर करणारा कार्यक्रम राहिला नसून भारताचा आत्मविश्वास आणि क्षमतांचे प्रतिबिंब आहे. २१ व्या शतकातील हा नवा भारत येणारी कोणतीही संधी सोडणार नाही. असे मोदींनी नमूद केले.

एरो इंडियाच्या पहिला दिवशी....

- संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परिषद

- हवाई दलाच्या ताफ्यातील विविध विमानांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली

- विविध उद्योगांचे प्रदर्शन आदी

पंतप्रधान म्हणाले...

- देशात नावीन्यपूर्ण व उत्तम दर्जाचे तंत्रज्ञान विकसित होत आहे

- मेक इन इंडियाच्या माध्यमातून 'मेक फॉर वर्ल्ड' असे ध्येय

- देशातील प्रत्येक क्षेत्रात क्रांती घडत आहे

- विविध देशातील संरक्षण मंत्र्यांच्या कॉनक्लेव्ह हे एरो इंडियाचे जागतिक स्तरावर महत्त्व वाढविण्यासाठी गरजेचे आहे.

देशात मित्र देशांची गुंतवणूक वाढविणे आणि भारतीय नविण्यातेच्या इकोसिस्टमला तयार करण्याकरिता नियमांना सोपे केले

- एफडीआयला मंजुरी

- उद्योगांसोबत लायसंसिंग करार करण्यासाठीची प्रक्रिया सोपी केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Smriti Mandhana Father: स्मृती मानधनाच्या वडिलांची प्रकृती आता कशी आहे? डॉक्टरांनी दिली महत्त्वाचे अपडेट्स

Rahuri Crime:'अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार'; आरोपीला अटक

Junnar Iron Man : ओझरचे अशोक जगदाळे ठरले इंटरनॅशनल आयर्न मॅन; आठ तासांत विक्रमी कामगिरी!

Pune Traffic Update : आज मध्यरात्रीपासून सिंहगड घाट वाहतुकीसाठी बंद; प्रशासनाचा आदेश; हे आहेत पर्यायी मार्ग!

India Squad Announcement: द. आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी गिलच्या ऐवजी 'हा' खेळाडू भारताचा कर्णधार; ऋतुराज, जडेजाचे पुनरागमन

SCROLL FOR NEXT