Dhananjaya Chandrachud sakal
देश

Dhananjaya Chandrachud : हातात कागदपत्रे नसलेले वकील म्हणजे बॅटविना तेंडुलकर! सरन्यायधीशांची टिप्पणी

वकील म्हणजे क्रिकेटच्या मैदानात बॅट न घेता असलेल्या सचिन तेंडुलकर सारखे आहे

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : आपल्याला युक्तिवाद करायचा असलेल्या खटल्याची संपूर्ण माहिती (ब्रीफिंगची प्रत) न घेता न्यायालयासमोर येणारे वकील म्हणजे क्रिकेटच्या मैदानात बॅट न घेता असलेल्या सचिन तेंडुलकर सारखे आहे, अशी मिश्किल टिप्पणी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज, शुक्रवारी केली.

न्या. चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी सुरू असलेल्या एका प्रकरणातील संबंधित वकील जेव्हा हातात कागदपत्रांची संक्षिप्त प्रत न देता त्याच्या खटल्याचा युक्तिवाद करू लागले तेव्हा न्या. चंद्रचूड यांनी वरील टिप्पणी केली.

ते म्हणाले की "ब्रीफ (खटल्याच्या माहितीचे कागद) हातात नसलेले वकील म्हणजे बॅटविना मैदानात उतरणाऱया सचिन तेंडुलकरसारखेच असतात. तुम्ही तुमच्या गाऊनमध्ये आणि बँडमध्ये असता, पण कागदपत्रे तुमच्या हाती नाहीत हे पाहणे खूप वाईट आहे. सुनावणीवेळी तुमचे ‘ब्रीफिंग' नेहमी तुमच्याजवळ असले पाहिजे."

जामीन प्रकरणांची सुनावणी वाढवा - चंद्रचूड

न्यायमूर्तींसमोरच्या पुरवणी यादीतील प्रलंबित खटल्यांची प्रकरणे कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे प्रत्येक खंडपीठ दर दिवसाला किमान १० हस्तांतरण आणि जामीन प्रकरणांची सुनावणी करेल असेही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी आज स्पष्ट केले.

नुकत्याच झालेल्या पूर्ण न्यायासनाच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केले. या गतीने सर्वोच्च न्यायालयातील १३ खंडपीठे दररोज किमान १३० प्रकरणे आणि दर आठवड्याला ६५० प्रकरणे निकाली काढतील. सध्या सर्वोच्च न्यायालयात खटले या न्यायालयातून त्या न्यायालयात हस्तांतरित करण्याबाबतची तब्बल १३ हजार प्रकरणे सध्या प्रलंबित आहेत.

जामीन देण्याबाबतच्या खटल्यांनाही प्राधान्य दिले जाईल असे सांगून न्या. चंद्रचूड म्हणाले की "सर्व न्यायाधीशांनी मला पूरक (सप्लीमेंटरी) खटल्यांच्या सुनावणीची यादी न देण्याची विनंती केली आहे. कारण न्यायमूर्ती सकाळपासून दुपारी वाजेपर्यंत खटल्यांचे वाचन व सुनावणीचे कामकाज करत आहेत. त्यामुळे आपण पूरक खटल्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत,‘‘ मात्र सर्व खंडपीठे दररोज जामीन देण्याबाबतची १० प्रकरणे घेतील असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Recruitment 2026: भरतीत दोन अभ्यासक्रमांतील उमेदवारांना डावलले! ;कन्स्ट्रक्शन सुपरवायझर,आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समनधारकांची पात्रतेची मागणी

Gokul Dairy : गोकुळचा २४ कोटींहून अधिक रुपयांचा तोटा भरून काढण्याचे आव्हान; चारा-पाण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार राजेश पाटील

Latest Marathi News Live Update : अजित पवार यांच्या पुतळ्याचे सोमवारी अमित शहा यांच्या हस्ते अनावरण

IAS Office : कर्नाटकातील केपीएससी भरती घोटाळा पुन्हा चर्चेत; ईडीने दाखल केले १,५०० पानी आरोपपत्र दाखल.

Bay of Bengal Low Pressure Area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तीव्र; महाराष्ट्रातील थंडी कमी होणार? राज्यात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT