देश

जनतेला "औरंगजेबी राज' नको: नरेंद्र मोदी

वृत्तसंस्था

पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसच्या "कौटुंबिक' राजकारणावर टीका

धरमपूर: गुजरात विधानसभा निवडणूक प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदावरील संभाव्य बढतीवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे हे "औरंगजेबी राज' असल्याचे मोदी यांनी म्हटले. त्यांच्या या टीकेला काँग्रेसनेही प्रत्युत्तर दिले.

राहुल गांधी यांनी आज काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. या मुद्द्यावरून प्रचारसभेत जनतेला संबोधताना मोदी म्हणाले, की काँग्रेस हा कंगाल पक्ष आहे. कारण जामिनावर बाहेर असलेल्या व्यक्तीला ते त्यांचा अध्यक्ष करत आहेत. राहुल गांधी यांना नॅशनल हेरल्डप्रकरणी जामीन मिळाला आहे. राहुल यांच्या अध्यक्ष म्हणून संभाव्य निवडीचे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी समर्थन केले होते. "मुघल काळात निवडणुका झाल्या होत्या का? जहांगीरनंतर शहाजहान आला. शहाजहाननंतर औरंगजेबच सत्ताधीश होणार हे सर्वांनाच माहीत होते,' असे अय्यर म्हणाले होते. मोदी यांनी या विधानाचाही समाचार घेतला. "काँग्रेस हा कौटुंबिक पक्ष आहे, हे काँग्रेसजनांना मान्य आहे का? आम्हाला औरंगजेब शासन नको आहे. जामिनावर असलेल्या नेत्याला जिल्हाध्यक्ष करतानाही इतर पक्ष सतरा वेळा विचार करतील. काँग्रेसने मात्र अशा व्यक्तीला अध्यक्षच करायचे ठरविले आहे,' असे मोदी म्हणाले. मोदींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनही काँग्रेसवर टीका केली.

राहुल यांच्यावर मोदींनी केलेल्या टीकेने काँग्रेस नेते संतप्त झाले. गुजरातमध्ये भाजपला पराभवाची खात्री असल्याने नैराश्‍येतून मोदी अशी टीका करत असल्याचे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. भाजप नेत्यांना आता "राहुलफोबिया' झाल्याचा टोलाही त्यांनी मारला.

विजयी महापौरांची मदत
लखनौ : गुजरात निवडणुकीच्या तोंडावरच उत्तर प्रदेशात स्थानिक निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयामुळे भाजपमध्ये उत्साह संचारला आहे. या विजयाचा फायदा करून घेण्यासाठी विजयी झालेल्या 14 महापौरांना प्रचारात उतरविण्याचा निर्णय भाजप नेत्यांनी घेतल्याचे समजते. हे सर्व विजयी उमेदवार पंतप्रधान मोदींची भेट घेऊन नंतर प्रचारात सहभागी होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT