atal bihari vajpayee
atal bihari vajpayee 
देश

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary: 'त्या'मुळे अटल बिहारी वाजपेयी राहिले अविवाहीत

वृत्तसंस्था

विवाह करण्यास वेळच मिळाला नसल्याने अविवाहीत राहिलो, असा खुलासा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी एका मुलाखतीदरम्यान दिला होता.

वाजपेयी यांनी एका वृत्तसंस्थेला 2002 मध्ये मुलाखत दिली होती. यावेळी त्यांना अविवाहीत राहण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी विवाह करण्यास वेळच मिळाला नसल्याचे उत्तर दिले होते.

पाचवीमध्ये शिक्षण घेत असताना वर्गात शिक्षकाने थप्पड मारलेला क्षण आयुष्यातील सर्वात कटु क्षण होता. कविता करत असतानाच राजकारणाकडे वळालो. राजकारण आणि कवितेमुळे वेळच मिळत नव्हता. आयुष्यात खुप चढ-उतार आले पण माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले, हा क्षण सर्वांत आनंदाचा होता, असे मुलाखतीदरम्यान वाजपेयी यांनी सांगितले होते.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, माजी राष्ट्रपती भैरवसिंग शेखावत, अप्पा घताते, जसवंतसिंग, डॉ. मुकुंद मोदी व व शिवकुमार हे माझे जिवलग मित्र आहेत. माझ्या यशाचे श्रेय हे वडील क्रिष्णा बिहारी वाजपेयी, गुरु गोळवलकरजी, पंडित दीन दयाळ उपाध्याय व संघाचे भाऊराव देवरास यांना जाते. पंडित दीन दयाळ उपाध्याय यांचे निधन झाले तेंव्हाचा क्षण सर्वांत दुःखाचा क्षण होता, असेही वाजपेयी यांनी सांगितले होते.

पंडित जवाहरलाल नेहरू हे आवडते नेते होते. शरतचंद्र व प्रेमचंद हे आवडते लेखक तर हरिवंशराय बच्चन हे आवडते कवी होते. अभिनेते संजीव कुमार, दिलीप कुमार, सुचित्रा सेन, राखी व नुतन हे आवडते होते. कभी कभी मेरे दिल मे..., ओ मेरे माझी..., सुन मेरे बंधू रे.... ही आवडती गाणी.

देवदास, बंदिनी, तिसरी कसम, मौसम, ममता ऍण्ड आंधी हे आवडते चित्रपट असून अनेकदा पाहिल्याचे वाजपेयींनी सांगितले. वडिलांसोबत वसतीगृहात रहात असताना जेवण तयार करायला शिकलो. एवढे सर्व काही करत असताना विवाह करण्यास वेळ मिळालाच नाही, असे वाजपेयी यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election: MPही सूरतची पुनरावृत्ती? शेवटच्या दिवशी काँग्रेस उमेदवाराने अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश..काँग्रेसची कोंडी

Gorakhpur Express Food Poisoning : अंडा बिर्याणीने केला प्रवाशांचा घात; गोरखपूर एक्स्प्रेसमधील ९० जणांना अन्नातून विषबाधा

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

SCROLL FOR NEXT