Digvijaya Singh File Photo
देश

दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावर काँग्रेसची 'सारवासारव'

वादग्रस्त ठरत असलेल्या दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावर सारवासारव करत तारिक तन्वीर त्यांनी भाजपच्या टीकेला उत्तर

एएनआय वृत्तसंस्था

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांनी जम्मू आणि काश्मीरमधील रद्द करण्यात आलेल्या कलम ३७० संदर्भात केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून यावर काँग्रेसच्या नेत्याने प्रतिक्रिया दिलीये. दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जातोय, अशी भूमिका काँग्रेसचे नेते तारिक अन्वर यांनी मांडली. यासंदर्भात त्यांनी एएनआयशी संवाद साधला. (Digvijaya Singh didnt say about withdrawal of Article 370 Congress leader Tariq Anwar)

तन्वीर म्हणाले की, कलम 370 संदर्भातील निर्णय रद्द करण्यासंदर्भात दिग्विजय सिंह यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. 2019 पासून यासंदर्भात काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. या निर्णयासंदर्भात पुन्हा विचार करु, असे दिग्विजय सिंह म्हणाले. वादग्रस्त ठरत असलेल्या दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावर सारवासारव करत तारिक तन्वीर त्यांनी भाजपच्या टीकेला उत्तर दिले आहे. (Digvijaya Singh didnt say about withdrawal of Article 370 Congress leader Tariq Anwar)

दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावरुन भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला होता. शेजारील पाकिस्तानला जे हवे आहे तेच काँग्रेस नेत्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे, अशा आशयाचे वक्तव्य भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी केले होते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून 'क्लबहाऊस'वरील संवादावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्वीजय सिंह यांनी एका पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला दिले. "जर काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला तर जम्मू आणि काश्मीरबाबतच्या कलम ३७० वर झालेल्या निर्णयाचा पक्षाकडून पुनर्विचार केला जाईल", असे दिग्वजय सिंह म्हणाले होते. या संवादाची ऑडिओ क्लीप ट्विट करुन भाजपचे अमित मालवीय यांनी ट्विटरवर शेअर केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यातील नवले पूलावर रास्तारोको; मोठी वाहतूक कोंडी, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Who is Ramakrishna Ghosh? नाशिकचा जन्म, पुण्यात गिरवले क्रिकेटचे धडे... CSK कडून आणखी एका महाराष्ट्रीय खेळाडूचे पदार्पण

Pune Girls Safety Crisis: बालिकांवरील लैंगिक अत्याचारांची मालिका; पुणेकरांचा संतप्त सवाल – ‘पुण्यात लेकी सुरक्षित आहेत तरी कुठे?’

HSC Exam Result : अंध मुलींचे बारावी परीक्षेत यश; जागृती स्किल डेव्हलपमेंट सेंटरचा फॉर ब्लाइंड गर्ल्सचा १००% निकाल कायम

Who is Raghu Sharma? मुंबई इंडियन्सने क्रीडा आहारतज्ज्ञ अन् ट्रेनरला दिली पदार्पणाची संधी; CSK विरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार

SCROLL FOR NEXT