Dimple Yadav-Shafiqur Rahman Barq-Samajwadi Party-announces the names of 16 candidates for the upcoming Lok Sabha elections 2024
Dimple Yadav-Shafiqur Rahman Barq-Samajwadi Party-announces the names of 16 candidates for the upcoming Lok Sabha elections 2024 
देश

Akhilesh Yadav: मैनपुरीत डिंपल अन् फिरोजाबादमध्ये अक्षय... लोकसभा निवडणुकीसाठी 'सपा'ची पहिली यादी जाहीर

Sandip Kapde

Akhilesh Yadav

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी (SP) ने 16 उमेदवारांची नावे जाहीर केली. डिंपल यादव मैनपुरीमधून, शफीकुर रहमान बारक संभलमधून आणि रविदास मेहरोत्रा लखनऊमधून निवडणूक लढवणार आहेत. सपाच्या पहिल्या यादीत 11 ओबीसी, 1 मुस्लिम, 1 दलित, 1 ठाकूर, 1 टंडन आणि 1 खत्री उमेदवारांचा समावेश आहे.

11 ओबीसी उमेदवारांपैकी 4 कुर्मी, 3 यादव, 2 शाक्य, 1 निषाद आणि 1 पाल समाजाचा आहे. अयोध्या लोकसभेसाठी (सर्वसाधारण जागा) दलित प्रवर्गातील पासी उमेदवाराला सपाने तिकीट दिले आहे. एटा आणि फर्रुखाबादमध्ये पहिल्यांदाच यादव यांच्या जागी शाक्य समाजाच्या नेत्यांना तिकीट देण्यात आले आहे. (Latest Marathi News)

अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला 11 जागांची ऑफर दिली होती. अलीकडेच, उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडी अंतर्गत सपा आणि आरएलडीची युती झाली होती, ज्या अंतर्गत सपा अध्यक्षांनी आरएलडीला 7 जागा देण्याची घोषणा केली होती. मात्र, या जागावाटपाबाबत काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. यानंतर उत्तरप्रदेशमध्ये युतीबाबत सस्पेंस निर्माण झाला होता. दरम्यान, आता अखिलेश यादव यांनी 16 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.

ही घोषणा अशा वेळी आली आहे. जेव्हा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पक्ष बदलून एनडीएमध्ये सामील झाल्यामुळे विरोधी पक्षांच्या इंडिया गटात फूट पडली आहे. पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी यांनी आगामी निवडणुका एकट्याने लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. (Akhilesh Yadav News in Marathi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबन घेतात, ठाकरे गटाने असं का म्हटलं?

Aditya Dhar & Yami Gautam : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यामी-आदित्यला पुत्ररत्न; जाणून घ्या बाळाचं नाव आणि त्याचा अर्थ

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Latest Marathi Live News Update: संसदेची सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी आजपासून CISF कडं!

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

SCROLL FOR NEXT