Jharkhand School Shooting: लव्ह ट्रायंगल अन् शाळेतच गोळीबार! शिक्षकाने केली दोन सहकाऱ्यांची हत्या..स्वतःवरही झाडली गोळी

Jharkhand School Shooting: रांचीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शाळेत गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सकाळी अकराच्या सुमारास शाळेतील शिक्षकांनी गोळीबार केल्याची ही घटना असून त्यावेळी शाळेत मुले शिकत होती.
Jharkhand School Shooting
Jharkhand School ShootingEsakal

झारखंडमधील एका शाळेत गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. गोड्डा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत झालेल्या गोळीबारात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. शाळेतील आरोपी शिक्षकानेही स्वत:वर गोळी झाडली आहे. गोळी लागल्याने शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. गोळीबाराची ही घटना पोडैयाहाट भागातील हायस्कूलमध्ये घडली आहे.

रांचीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या या शाळेत गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. सकाळी अकराच्या सुमारास शाळेतील शिक्षकांनी गोळीबार केला असून त्यावेळी शाळेत मुले शिकत होती. गोड्डा पोलिस अधीक्षक नाथू सिंग मीना यांनी पीटीआयला सांगितले की, 'शाळेच्या एका खोलीत दोन शिक्षकांचे मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्यामध्ये एक महिला शिक्षिकाही होती. आरोपी शिक्षकही जखमी अवस्थेत आढळून आला आहे'.

Jharkhand School Shooting
Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिदीच्या भिंतींवर सापडले तेलुगु भाषेतील शिलालेख; मंदिर निर्माणबद्दल मोठी माहिती आली समोर

गोळीबाराची ही घटना शिक्षकांमधील प्रेम संबधातून घडल्याचे काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. गोळी झाडणाऱ्या शिक्षकाचे एका महिला शिक्षिकेसोबत पूर्वीपासून प्रेमसंबंध होते. नंतर शिक्षिका त्याच शाळेतील दुसऱ्या शिक्षकाशी जवळीक करू लागली. याचा राग आल्याने आरोपी शिक्षकाने शाळेच्या वाचनालयात गोळीबार केला आहे.

Jharkhand School Shooting
Govt Doctor News: वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्टरांना झटका! आता खासगी प्रॅक्टिसला लागणार कात्री

सुजाता देवी असे मृत महिला शिक्षिकेचे नाव असल्याचे दुसऱ्या एका मीडिया रिपोर्टमध्ये सांगितले आहे. याशिवाय आदेश सिंह असे आणखी एका मृत शिक्षकाचे नाव आहे. गोळीबार करणाऱ्या शिक्षकाचे नाव रवी रंजन असल्याचे सांगण्यात येत आहे. सुजाताचा पती सैन्यात आहे. सुजाता आणि आदेश यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या रवी रंजनचा त्याचा पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे. शाळेच्या लायब्ररीमध्ये हा गोळीबार झाल्याची माहिती आहे. गोळीबाराच्या घटनेने शाळेतील विद्यार्थी हादरले. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Jharkhand School Shooting
Bus Accident: भरधाव बसमध्ये चालकाला हृदयविकाराचा झटका; मृत्यूपुर्वी वाचवले 65 प्रवाशांचे प्राण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com