coronavirus
coronavirus 
देश

देशात बरे झालेले सव्वापाच लाखांवर

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - कोरोनापासून मुक्ती मिळालेल्या रुग्णांची संख्या देशात वाढत असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. ही संख्या आतापर्यंत ५.३ लाखांहून अधिक झाली आहे. तर सक्रिय रुग्णांची संख्या २.९ लाख आहे. चाचण्यांचे प्रमाण वाढले असून मागील २४ तासात १९,००० हून अधिक जण बरे झाल्याचेही सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कालच गृहमंत्री अमित शाह, आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या उपस्थितीत कोरोना विरुद्धच्या तयारीचा आढावा घेतला होता. तसेच दिल्लीसह देशभरात कोरोना नियंत्रित असल्याचे समाधानही व्यक्त करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने  राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन असल्याचा दावा केला आहे. 

यामुळे वेळेवर कोरोनाचे निदान होऊन उपचार झाल्यास रुग्ण बरे होत असल्याने मागील २४ तासांमध्ये एकूण १९,२३५ रूग्ण बरे झाल्याचे आरोग्य खात्याने म्हटले आहे. देशभरात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५,३४,६२० झाली आहे. सद्यःस्थितीत देशभरातील सक्रिय रुग्णांची संख्या  २.९ लाखअसून त्यापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या २.४२ लाखांनी अधिक असल्याचेही सरकारचे म्हणणे आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देशात एकूण १३७० कोविड समर्पित रुग्णालये (डीसीएच), ३०६२ कोविड समर्पित आरोग्य केंद्रे (डीसीएचसी) आणि १०३३४ कोविड दक्षता केंद्रे (सीसीसी) कार्यरत आहेत. केंद्र सरकारकडून आत्तापर्यंत १२२.३६ लाख पीपीई संच, २२३.३३ एन९५ मास्क, आणि २१,६८५ व्हेंटिलेटर्स राज्यांना देण्यात आले आहेत.

चाचण्या वाढल्या
कोरोना चाचणीतील अडथळे दूर केल्याने राज्यांमध्ये चाचण्या घेण्यात वाढ होत आहे. मागील २४ तासांमध्ये २,८०,१५१ चाचण्या घेण्यात आल्या. आत्तापर्यंत देशात १,१५,८७,१५३ चाचण्या झाल्या असून हे प्रमाण दहा लाख लोकसंख्येमागे ८३९६.४ चाचण्या असे आहे. यासाठी ८५० सरकारी आणि ३४४ खासगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत.

Edited by : Kalyan Bhalerao

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT