देश

कर्नाटकातील काँग्रेसमध्ये उफाळला नव्या-जुन्यांमधील वाद

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर - असंतुष्ट आमदारांची डोकेदुखी कायमची असतानाच आता राज्य काँग्रेसमध्ये नवे-जुने वाद उफाळून आला आहे. त्यामुळे, युती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता लांबणीवर पडला आहे. युती सरकार अडचणीत येण्यास माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्याच कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामलिंगा रेड्डी, रोशन बेग व इतर काही वरिष्ठ नेत्यांनी केल्याने अडचणीत भर पडली आहे.

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात अपक्ष आमदार व पक्षात नवे असलेल्यांना सामावून घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट होताच पक्षातील ज्येष्ठ व मूळ काँग्रेसी नेत्यांनी बंडाची भूमिका घेतली. यावरुन त्यांनी माजी मुख्यमंत्री सिध्दरामय्या व प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव यांच्याविरुध्द आगपाखड सुरू केली आहे. 

मूळ व निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यातच पुढील काळात आपल्या अस्तित्वालाच धोका असल्याची भिती मल्लिकार्जुन खर्गे, वीराप्पा मोईली, मुनियप्पा आदींनी व्यक्‍त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गुंडुराव यांनी सिध्दरामय्या यांची भेट घेऊन चालू घडामोडींवर चर्चा केली.

दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये असंतोष असल्याने मुख्यमंत्री कुमारस्वामीही धर्मसंकटात सापडले आहेत. रोशन बेग यांनी भाजपात प्रवेश करण्याचा प्रयत्न चालविला आहे. भाजपचे माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांची भेट घेऊन चर्चा सुरू केली आहे. धजदचे प्रदेशाध्यक्ष विश्वनाथ यांनीही सिध्दरामय्या यांनाच लक्ष्य करुन प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

धजदचे वरिष्ठ नेते बसवराज होरट्टी यांनीही सिध्दरामय्या यांच्या लहरीवर युती सरकार चालत असल्याचा आरोप केला. धजद विधिमंडळच्या बैठकीलाही अनुपस्थित राहून त्यांनी आपली नाराजी दाखवून दिली. एकीकडे भाजपच्या ‘ऑपरेशन कमळ’ची धास्ती दुसरीकडे पक्षांतर्गत लाथाळ्यांमुळे युती सरकार अडचणीत आले आहे. चालू घडामोडींमुळे हा कार्यक्रम पुन्हा लांबणीवर पडला आहे. 

ज्येष्ठांची बैठक बोलवा
राज्यातील ज्येष्ठ नेत्यांत निर्माण झालेला असंतोष व युती सरकारवर आलेले संकट दूर करण्यासाठी काँग्रेसच्या हायकमांडने ज्येष्ठ नेत्यांची तातडीने बैठक बोलवावी, अशी मागणी माजी मंत्री व ज्येष्ठ नेते एच. के. पाटील यांनी केली आहे. वेळ निघून जाण्यापूर्वी सरकारने ही बाब गांभिर्याने घ्यावी व त्यातून मार्ग काढावा असा सल्ला त्यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs KKR Live Score: केएल राहुलने जिंकला टॉस, लखनौ संघात मोठा बदल; जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग-11

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

SCROLL FOR NEXT