Dr. Suresh Chaudhary esakal
देश

प्रेमासाठी काय पण! पत्नीच्या उपचारासाठी डॉक्टरनं MBBS पदवी ठेवली गहाण

सकाळ डिजिटल टीम

पत्नीच्या आजारपणात डॉक्टरांना खूप त्रास सहन करावा लागला.

पाली : प्रेमासाठी (Love) वाट्टेल ते असं आपण अनेकदा ऐकलं असेल. एक दुजे के लिये, जिना मरना तेरे संग हे चित्रपटही आपल्याला आठवणीत असतीलच; पण चित्रपटातलं प्रत्यक्ष आयुष्यात घडू शकतं हे म्हटल्यावर प्रत्येकाला आश्चर्य वाटेल. राजस्थानातील (Rajasthan) पालीमध्ये एका डॉक्टरनं खऱ्या प्रेमाचं उत्तम उदाहरण दिलंय. पत्नीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरनं 'एमबीबीएस'ची पदवी (MBBS Degree) गहाण ठेवलीय. हे प्रकरण आता उघडकीस आल्यानंतर नेटकऱ्यांकडून डॉक्टरांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पत्नीच्या उपचाराकरता पैसे उभे करण्यासाठी एमबीबीएसची पदवी गहाण ठेवणाऱ्या डॉक्टरचं नाव डॉ. सुरेश चौधरी (Dr. Suresh Chaudhary) आहे. डॉक्टरनं एमबीबीएसची पदवी गहाण ठेवून 70 लाखांचं कर्ज घेतलं. पत्नीच्या उपचारासाठी 1.25 कोटी रुपये खर्च करण्यात आला. गतवर्षी 13 मे रोजी डॉक्टरांच्या पत्नीला कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याचं आढळून आलं. त्यानंतर तिची तब्येत इतकी खालावली की, तिला रुग्णालयात दाखल करावं लागलं. उपचारादरम्यान डॉक्टरांच्या पत्नीला ECMO सपोर्टवर ठेवावं लागलं, त्यांची प्रकृती चिंताजनक होती.

डॉ. सुरेश चौधरी यांचं वय आता 32 वर्षे आहे. ते पाली येथील खिरवा गावचे रहिवासी आहेत. त्यांना 5 वर्षांचा मुलगाही आहे. पत्नीच्या आजारपणात त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. कोविडमुळं डॉक्टरांच्या पत्नीच्या फुफ्फुसाचं 95 टक्के नुकसान झालं. यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. यानंतरही महिलेची प्रकृती खालावतच होती. डॉक्टरांच्या पत्नीचं वजन 20 किलोनं कमी झालं आणि त्यांच्या शरीरात फक्त 1.5 युनिट रक्त शिल्लक राहिलं. त्यामुळं डॉक्टरांच्या पत्नीला ECMO सपोर्टवर ठेवण्यात आलं. पत्नीच्या उपचारासाठी पैशाची खूप गरज होती. अशावेळी डॉक्टरांनी आपली एमबीबीएसची पदवी गहाण ठेवण्याचा निर्णय घेतला आणि पत्नीचे प्राण वाचवले. त्यांच्या या कृतीने समाजापुढं एक आदर्श घालून दिलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT