dog Sakal
देश

निर्दयी! तीन नराधमांनी कुत्र्याला दिली फाशी; कुत्र्याचा दुर्दैवी मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

गाझियाबाद : तीन व्यक्तींनी एका कुत्र्याला फाशी दिल्याची घटना उत्तरप्रदेशमधील गाझियाबाद येथे घडली आहे. या तीन नराधमांनी कुत्र्याला मरेपर्यंत फाशी देत त्याची हत्या केली असून आरोपींची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(Marathi Crime News)

हेही वाचा - मामाच्या जमिनीवरून सावकाराला पळविणारा 'डेबू' कसा बनला गाडगेबाबा.....

अधिक माहितीनुसार, एका बांधकाम साईटवरील तीन व्यक्ती एका कुत्र्याची मान बांधून त्याला लोखंडी साखळीने लटकवत आहेत. तर एकजण साखळी ओढतो. त्यानंतर कुत्र्याचा विव्हळण्याचा आवाज येतो. पण त्यानंतरही त्याला खाली सोडण्यात येत नाही. या प्रकरणात अखेर त्या निर्दयी कुत्र्याचा बळी जातो. तर हा व्हिडिओ तीन महिन्यापूर्वीचा असल्याचं पोलिसांनी सांगितलं असून तीन आरोपींनी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, मागच्या काही दिवासांत कुत्र्याला मारहाण आणि मारण्याच्या घटना वाढल्या असून दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये एका व्यक्तीने कुत्र्याची गोळ्या झाडून हत्या केली होती. कुत्रा आपल्याला भुंकतो म्हणून दारूच्या नशेत असलेल्या एका व्यक्तीने शेजाऱ्याच्या कुत्र्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यामध्ये कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Student Pass : एसटीचा मोठा निर्णय ! कागदी पास बंद, आता विद्यार्थ्यांचा बस प्रवास होणार डिजिटल; NCMC स्मार्ट कार्डमुळे मिळणार 'हे' फायदे

Mumbai News: महामुंबईतील कोंडी फुटणार! भुयारी मार्ग, मेट्रोसाठी २२ हजार कोटी मंजूर; नवी मुंबईत होणार विस्तार

Akola: उज्ज्वला लाभार्थी पुन्हा चुलीकडे; दरवाढ आणि टंचाईचा दुहेरी फटका; ग्रामीण भागात सरपण जमा करण्यासाठी नागरिकांची लगबग; सिलिंडर टंचाईवर सरपणाचा पयार्य

Israel Military Allegations : इस्रायलच्या महिला अधिकाऱ्यांकडून कैद्यांचा लैंगिक छळ; तुरुंगात नग्न केलं अन् त्यांच्या अंगावर शिकारी कुत्री...

Cockroach Janata Party Protest : पुण्यात ‘कॉकरोच जनता पार्टी’चे आंदोलन; दिल्लीतील जंतरमंतरनंतर अभिजित दिपके यांचा महाराष्ट्रात पहिलाच एल्गार

SCROLL FOR NEXT