To Donate Kidney To Brother Engineering Student Commits Suicide
To Donate Kidney To Brother Engineering Student Commits Suicide 
देश

भावाला किडनी देता यावी म्हणून त्याने केली आत्महत्या

वृत्तसंस्था

वलसाड - आपल्या मोठ्या भावाला किडनी दान करता यावी म्हणून आत्महत्या केल्याची घटना गुजरातमधील वलसाड येथे उघडकीस आली आहे. अभियांत्रीकीच्या दुसऱ्या वर्षाला असलेल्या तरूणानं आजारी असलेल्या भावाला किडनी मिळावी म्हणून आत्महत्या केली. परंतु, त्याने केलेला त्याग व्यर्थ गेला. वसतीगृहात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याच्या पार्थिवाची स्थिती अवयवदान करण्यासारखी नव्हती म्हणून त्याच्या किडनी भावाला देता आल्या नाहीत.

वलसाडजवळच्या पारडी इथला नैतीकुमार तांडेल अभियांत्रीकीच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. बडोद्यामध्ये वसतीगृहात गळफास घेतलेलया अवस्थेत त्याच्या मित्रांना तो आढळला. त्यांनी पोलिसांना ही घटना कळवली. त्यावेळी पोलिसांना तपासात आत्महत्येचं कारण सांगणारी चिठ्ठी मिळाली. या प्रकरणी कुणाचीही पोलिसांनी चौकशी करू नये असं त्यानं चिठ्ठीत लिहिलं होतं. नैतीकुमारनं लिहिलं होतं की त्याचा मोठा भाऊ केनीश हा अत्यंत आजारी असून त्याच्या दोन्ही किडनी खराब झाल्या आहेत आणि किडनी दानाची गरज आहे. माझ्या किडनी त्याला द्याव्यात तसेच अन्य अवयवही गरजूंना द्यावेत अशी इच्छा त्यानं व्यक्त केली होती, असं पोलिसांनी यावेळी सांगितले.

परंतु, ज्यावेळी आम्हाला त्याचा मृतदेह मिळाला त्यावेळी त्याचे अवयवदान करणं अशक्य होतं. असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीने राखला घरचा गड! तिलक वर्मा शेवटपर्यंत लढला, मात्र मुंबईच्या पदरी पराभवच

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : एक सच्चा देशभक्त संसदेत पोहोचणार आहे- आशिष शेलार

SCROLL FOR NEXT