steam inhelar
steam inhelar Sakal media
देश

"कोविडमध्ये पाण्याच्या वाफेला वैद्यकीय उपचार मानता येणार नाही"

Amit Ujagare (अमित उजागरे)

चेन्नई : सध्याच्या कोविडच्या उपचारांमध्ये रुग्णांना प्राधान्याने पाण्याची वाफ (steam enhalation) घेण्यास सांगितलं जात आहे. यामुळे सर्दी-खोकला बरा होण्यास मदत होते त्याचबरोबर पाण्याच्या गरम वाफेमुळे नाकातील-घशातील जंतूसंसर्ग रोखण्यास मदत होत असल्याचं सांगितलं जातं. मात्र, हा दावा तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एम. ए. सुब्रमन्यम यांनी खोडून काढला आहे. त्यांनी म्हटलंय की, "कोविडच्या उपचारांमध्ये पाण्याच्या वाफेचा वापर हा वैद्यकीय उपचार मानता येणार नाही." फुफ्फुस तज्ज्ञ (pulmonary specialist) डॉक्टरांनीही याला दुजोरा दिला आहे. (Dont consider steam inhalation as medical treatment for Covid says Tamil Nadu Health Minister)

"जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारने कोविड १९ उपचारांसाठी प्रोटोकॉल तयार केला आहे. त्यामुळे आपल्या जीवाला मोठा धोका निर्माण होईल असा औषधोपचार नागरिकांनी परस्पर घेऊ नये," असं आवाहन आरोग्यमंत्री सुब्रमन्यम यांनी केलं आहे. तसेच ते पुढे म्हणाले, “पाण्याची वाफ वापरण्याची प्रथा सर्वत्र पसरत आहे. पाण्याची वाफ घेणं हे कोविड आजार रोखण्यासाठी प्रभावी असल्याच्या पोस्ट सध्या सोशल मीडियातून शेअर केल्या जात आहेत. पण गरम वाफेच्या दाबामुळे फुफ्फुसांवर विपरीत परिणाम होऊ शकतो तसेच यासाठी लोक जेव्हा तोंड उघडून श्वास घेतात तेव्हा त्या व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता खूप अधिक असते. त्यामुळे पाण्याची वाफ घेणं याला वैद्यकीय उपचार मानता येणार नाही. तर संक्रमित व्यक्तीनं परस्पर कुठलेतरी उपचार घेण्याऐवजी रुग्णालयात गेलं पाहिजे आणि वैद्यकीय मदत घ्यावी," असंही त्यांनी म्हटलं आहे.

पाण्याची वाफ घेणं अवैज्ञानिक - फुफ्फुस तज्ज्ञ

या पाण्याच्या वाफेबाबत माहिती देताना फुफ्फुस तज्ज्ञ डॉ. प्रसन्नकुमार थॉमस यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, "पाण्याची वाफ घेणं हे पूर्णपणे अवैज्ञानिक आहे. कोविड-१९च्या आजारामध्ये नाकासंबंधी त्रास होत नाही. यामध्ये नाक वाहिलं अशी सर्दी होत नाही. तर कोरोनाचा विषाणू हा घशात अडकतो आणि तो खाली सरकतो. तसेच आपण वारंवार एकाच मशिनमधून वाफ घेत राहिलो तर त्याद्वारे या विषाणूचे संक्रमण वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे हे पूर्णपणे अवैज्ञानिक आहे. लोकांना वाफ घेण्याची कल्पना कुठून सुचली हे ठाऊक नाही. तर तुम्हाला वाफ घ्यायचीच असेल तर ती तुमच्या घरातच घ्या याचा सार्वजनिक उपचार करु नका. कारण पाण्याच्या वाफेमुळे कोविड बरा होत नाही हे लोकांना कळायला हवं. उलट याचा वापर केल्यास संक्रमणाचा धोकाच जास्त असतो"

भाजपकडून दिली जातेय सार्वजनिक पाण्याची वाफ

दरम्यान, तामिळनाडूतील कोईम्बतूर येथे शनिवारी भाजप महिला मोर्चाकडून फिरत्या वाफ देणाऱ्या वाहनाचं उद्घाटन केलं. त्याचबरोबर एमजीआर रेल्वे स्टेशनवर तामिळनाडू रेल्वे पोलिसांकडून प्रवाशांसाठी अशा प्रकारच्या पाण्याच्या वाफेचं यंत्र उपलब्ध करुन दिलं आहे. याद्वारे सामुहिक पाण्याची वाफ देण्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरलं झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT