Gujrat Mehsana
Gujrat Mehsana Sakal
देश

डोक्यावरुन पदर हटवा, तरच सन्मान स्वीकारेन; मंत्र्यांच्या भूमिकेचं कौतुक

सकाळ डिजिटल टीम

गुजरातमधल्या मेहसाना जिल्ह्यातली पहिली महिला सरपंच व्यासपीठावर आली. तिचा चेहरा पदराने झाकलेला होता. राज्याचे शिक्षणमंत्री जितू वघानी यांचा सत्कार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. पदराने चेहरा झाकलेला असतानाच त्या मंचावर गेल्या. मात्र त्यानंतर जे झालं ते अनपेक्षित होतं. (Gujrat Tradition veil on face)

गुजरातमधल्या मेहसाना जिल्ह्यातल्या रणतेज गावच्या सरपंच मीनाबा झाला या अशाच प्रकारे पदराने चेहरा झाकलेल्या, जमिनीवरच बसलेल्या महिलांच्या घोळक्यातून उठून शिक्षणमंत्र्यांचा सन्मान करण्यासाठी व्यासपीठावर आल्या. दुसऱ्या बाजूला गावातले पुरुष प्लास्टिकच्या खुर्च्यांवर बसले होते. त्या शिक्षणमंत्र्यांचा (Education Minister of Gujarat) सन्मान करण्यासाठी पुढे आल्या, मात्र तेवढ्यात मंत्र्यांनी त्यांना रोखलं.

शिक्षणमंत्री जितू वघानी यांनी मीनाबा यांना डोक्यावरचा पदर काढायला सांगितला. डोक्यावरचा पदर काढल्यानंतरच मी सन्मान स्वीकारेन असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं. जमलेल्या सर्व गावकऱ्यांसमोर त्यांनी विचारलं की जर गावातल्या ज्येष्ठांनी परवानगी दिली तर मी मीनाबा यांना विनंती करेन की त्यांनी ही परंपरा मोडावी. मात्र जमावातून जोरदार विरोध झाला. आम्ही राजपूत आहोत, असं चालणार नाही, असं गावकरी म्हणू लागले.

त्यावर शिक्षणमंत्र्यांनीही उत्तर दिलं. इथं जातीचा काय संबंध? दरबार, पटेल, वाणी, ब्राह्मण...महिला कशा खूश राहतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील ..याकडेच आपण लक्ष द्यायला हवं. मान मर्यादा वगैरे सगळं ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही एका गावाच्या सरपंच आहात, तेव्हा तुम्ही या परंपरा मोडायला हव्यात. गावाला हे ठरवू द्या. आजूबाजूला जरा पाहा जग कुठे पोहोचलंय? डोक्यावरुन पदर हटवल्याने तुमची मान मर्यादा कमी होणार नाही. घरी सगळ्या परंपरांचं पालन करा. परंपरा चुकीची असं मी म्हणत नाही. पण आपल्याला काळानुरुप बदलायला हवं. आणि त्यानंतर त्यांच्यातल्याच एका वृद्ध व्यक्तीला मंत्र्यांचं हे म्हणणं पटलं. त्यावेळी गावातल्या सर्व महिलांनी डोक्यावरुन पदर हटवला. सरपंच मीनाबा यांना सन्मानाने व्यासपीठावर बसण्यासाठी खुर्ची देण्यात आली.

स्त्री पुरुष समानतेच्या (Gender Equality) दिशेने त्या दिवशी या गावाने एक मोठं पाऊल टाकलं. अशा प्रकारच्या छोट्या बदलांमुळेच पुढे मोठे बदल घडून येतात, अशी भावना या घटनेनंतर व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT