UGC  Team eSakal
देश

Dual Degree : UGC ने केलं सर्व शंकाचे निरसन; वाचा कशी मिळणार डिग्री

या कार्यक्रमांतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी संस्थांकडून क्रेडिट घेण्याची परवानगी दिली जाणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : यूजीसी (UGC) अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतेच यूजीसी विद्यार्थ्यांना दोन पूर्ण-वेळ पदवी अभ्यासक्रम एकाच वेळी भौतिक मोडमध्ये शिकण्याची परवानगी देण्याचे जाहीर केले आहे. दरम्यान, यासंबंधित UGC ने मंगळवारी दुहेरी पदवी कार्यक्रमाशी संबंधित अनेक शंका आणि असलेला गोंधळ दूर केला आहे. याशिवाय यूजीसीने संयुक्त पदवी आणि दुहेरी पदवी कार्यक्रमांसाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली असून, नवीन नियम लवकरच यूजीसीच्या वेबसाइटवर टाकण्यात येणार आहेत. (UGC Dual Degree Program)

30 टक्के गुण मिळणार

यूजीसीने स्पष्ट केले की, या कार्यक्रमांतर्गत भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी संस्थांकडून क्रेडिट घेण्याची परवानगी दिली जाणार आहे. हे क्रेडिट परदेशी संस्थेकडून 30 टक्क्यांच्या वरच्या मर्यादेपर्यंत घेतले जाऊ शकते. तर परदेशी विद्यार्थ्यांनाही भारतीय विद्यापीठाकडून 30 टक्के क्रेडिट मिळू शकणार आहे. या अंतर्गत, भारतीय उच्च शिक्षण संस्था पदवी प्रदान करेल तर विद्यार्थ्यांना एक किंवा दोन सेमिस्टरसाठी परदेशात शिक्षण घेण्याची संधी दिली जाणार आहे.

कोणत्या संस्था असणार पात्र ?

या प्रश्नाबाबतही बराच गोंधळ होता, ज्याचे यूजीसीने स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार यासाठी पात्र ठरलेल्या संस्था पुढीलप्रमाणे असणार आहेत.

1. NAAC ग्रेडिंगमध्ये 01 किंवा त्याहून अधिक गुण मिळवणारी महाविद्यालये

2. NIRF रँकिंग किंवा QS रँकिंगमधील शीर्ष 100 विद्यापीठे

3. NIRF रँकिंगनुसार टॉप 100 कॉलेज

4. महाविद्यालय/विद्यापीठ वैधानिक मंडळामध्ये चर्चा आणि मंजुरीनंतर सुविधा कार्यक्रम राबवू शकणार.

5. UGC नियम, भारतीय आणि परदेशी संस्था दुहेरी पदवी कार्यक्रमात सहभागी असणार.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन पदवी प्रदान करेल तर, विद्यार्थ्यांना एक किंवा दोन सेमिस्टरसाठी परदेशात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. परदेशी संस्था विद्यार्थ्याला क्रेडिट्सची संख्या दिल्याचे दर्शविणारे प्रमाणपत्र जारी करेल. ज्या विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे त्या भारतीय विद्यार्थ्यांद्वारे ही पदवी दिली जाईल. सध्या भारतीय संस्थांमध्ये 4 कोटी विद्यार्थी असून त्यात 10 कोटींनी वाढ होण्याची शक्यता आहे. यापूर्वी संयुक्त पदव्या नव्हत्या, मात्र, याला मान्यता दिल्यानंतर याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : शिरूरमध्ये गोळीबाराचा थरार; हरी गंगावणे यांचा मृत्यू, CCTV फुटेज समोर

UPI MDR Charge: UPI पेमेंटवर चार्ज लागू झाला तरी हे 6 UPI व्यवहार फ्री! एक रुपयाही चार्ज नाही; जाणून घ्या कोणते

IND vs PAK Asian Games : श्रेयस अय्यरचा संघ आशियाई स्पर्धेत पाकिस्तानला भिडणार? जाणून घ्या हा महामुकाबला केव्हा होणार

Marathi News Live Updates : शिरूरच्या आंबेडकर नगरमध्ये गोळीबार; दुचाकीवरून जात असलेल्या तरुणावर झाडल्या गोळ्या

Tukaram Mundhe:तुकाराम मुंढेंकडून रुग्णालयांमधील भरमसाठ बिलांचा पर्दाफाश तुमची कशी होतेय लूट?

SCROLL FOR NEXT