कोल्हापूर : माजी अध्यक्ष अरुण डोंगळे, माजी संचालक, तीन पक्षांसह दोन पॅनेलच्या इच्छुकांची आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली. एकाच दिवसात ७१ उमेदवारांचे ९७ अर्ज दाखल झाले असून, २६ दुबार आहेत. आजपर्यंत एकूण ८६ उमेदवारांचे ११६ अर्ज दाखल झाले असून, ३० दुबार आहेत. दरम्यान, आजपासून सलग तीन दिवस सुटी असल्यामुळे आता थेट सोमवारी अर्ज दाखल करून घेतले जातील.