Earthquake 
देश

Earthquake in Delhi-NCR : दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के!

रोहित कणसे

दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील मोठ्या भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सुमारे एक मिनिट भूकंपाचे धक्के जाणवत होते आणि इमारती देखील हादरत राहिल्या.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.६ इतकी नोंदवण्यात आली होती, मात्र ती खूप जास्त जाणवली. दिल्ली-एनसीआरसह हरियाणा, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब आणि राजस्थानच्या मोठ्या भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळ होता आणि त्याची खोली पृथ्वीपासून १० किलोमीटर खाली होती. नेपाळमध्ये आज दुपारी २:२५ वाजता ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा तर २:५१ वाजता ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा दुसरा भूकंप झाला.

उंच इमारती असलेल्या भागात हा भूकंप मोठ्या तीव्रतेने जाणवला. एकापाठोपाठ एक धक्के जाणवत राहिले. दिल्ली-एनसीआरमध्ये लोक इमारतींमधून बाहेर धावलेआणि बाहेर गर्दी दिसून आली. घरातील पंखे, फर्निचर थरथरायला लागले आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. सध्या या भूकंपाचा किती परिणाम झाला याची माहिती गोळा केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane Crime: क्लासला जातो सांगून ५ जण घराबाहेर पडले, लखनौला पोहोचल्याचे समजल्या नंतर...; मुंब्य्रात नेमकं काय घडलं?

Pune Accident: राजगड सहलीवर काळाचा घाला! पाबे घाटात ट्रॅव्हल बस ४० फूट दरीत; दोन ठार, 19 जण जखमी..

Mumbai Crime: पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद पेटला, कोयता उपसला अन्...; सीएसएमटीबाहेर थरारक घटना

Bride Theft Case : लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू भावोजीसोबत फरार, पोलीस तपासात खळबळजनक सत्य उघड; पतीसह कुटुंबाला मोठा धक्का !

Latest Marathi News Update : पंढरपुरात पावसाची दमदार हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

SCROLL FOR NEXT