ED Action esakal
देश

ED Action : दुबईत लपलेल्या खाण माफियावर ईडीची मोठी कारवाई; हाजी इक्बालची ४ हजार ४४० कोटींची संपत्ती जप्त

ईडीने सहारनपूर येथील ग्लोकल युनिर्व्हसिटी येथील ४ हजार ४४० कोटी रुपये किंमतीची १२१ एकर जमीन आणि इमारतींवर तात्पुरती जप्तीची कारवाई केली आहे. ही जमीन अब्दुल वाहीद एज्युकेशनल आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने नोंदणीकृत आहे.

संतोष कानडे

Haji Iqbal News : कुख्यात खाण माफिया आणि माजी आमदार हाजी इक्बाल हा दुबईमध्ये लपून बसलेला आहे. त्याच्या संपत्तीवर ईडीने जप्तीची कारवाई केलीय. उत्तर प्रदेशातल्या लखनऊ येथील ईडीच्या झोनल कार्यालयाने शुक्रवारी ही कारवाई केली.

ईडीने सहारनपूर येथील ग्लोकल युनिर्व्हसिटी येथील ४ हजार ४४० कोटी रुपये किंमतीची १२१ एकर जमीन आणि इमारतींवर तात्पुरती जप्तीची कारवाई केली आहे. ही जमीन अब्दुल वाहीद एज्युकेशनल आणि चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने नोंदणीकृत आहे.

या ट्रस्टवर माजी आमदार हाजी इक्बाल आणि त्याच्या कुटुंबाचं नियंत्रण आहे. ही कारवाई पीएमएलए २००२ कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. अवैध उत्खननाचं हे प्रकरण आहे. खाण पट्ट्यांचं अवैधरित्या नूतनीकरण प्रकरणात सीबीआयने महेमूद अली, दिलशाद, मोहम्मद इमान, महबूब आलम, नसीम अहमद, अमित जैन, विकास अग्रवाल, मोहम्मद वाजिद, मुकेश जैन आणि पुनित जैन यांच्यासह काही सरकारी अधिकारी आणि अज्ञात व्यक्तींवर कारवाई केली होती.

अब्दुल वहीद एज्युकेशनल अँड चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व ट्रस्टी हे मोहम्मद इक्बालच्या कुटुंबातील सदस्य असल्याचं तपासामध्ये पुढे आलेलं होतं. त्यात स्वतः इक्बालचाही समावेश आहे. ट्रस्टला मिळालेल्या निधीचा वापर सहारनपूर येथे जमीन खरेदी आणि ग्लोकल युनिर्व्हसिटीच्या बांधकामासाठी करण्यात आला होता. या संपत्तीचं बाजारमूल्य ४ हजार ४३० कोटी रुपये इतकं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success story: गुन्हेगारीमुळे बदनाम होतं गाव! आता प्रत्येक घरामध्ये आहेत अधिकारी; नेमका बदल कसा झाला?

Asia Cup 2025: भारताच्या ७ खेळाडूंचे आशिया चषक संघात पदार्पण; त्यापैकी पाच प्लेइंग इलेव्हनमध्ये नक्की दिसणार

Crime: १८ वेळा चाकूने वार, नंतर गळा चिरला; १४ वर्षाच्या मुलाने १० वर्षांच्या मुलीला संपवलं, 'त्या' चुकीमुळे प्रकरणाचा उलगडा

Latest Marathi News Updates : ओबीसी समाज बांधवांची बैठक ठरली फिकी; रिकाम्या खुर्च्या ठळकपणे जाणवल्या

Chandrababu Naidu: ‘एनडीए’च्याच उमेदवाराला पाठिंबा; चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण, राधाकृष्णन यांचे केले कौतुक

SCROLL FOR NEXT