ED officer Ends life by jumping on railway track Esakal
देश

ED अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा, CBIच्या भीतीने रेल्वे समोर मारली उडी, जाणून काय आहे प्रकरण?

ED: भ्रष्टाचार प्रकरणात आलोक रंजन यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. CBI कडून अटकेच्या भीतीने ते चिंतेत होते.

आशुतोष मसगौंडे

अंमलबजावणी संचनालयात (ED) कार्यरत असलेले अधिकारी आलोक कुमार रंजन यांनी आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. साहिबाबाद रेल्वे स्थानकाजवळ अलोक कुमार रंजन यांनी आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळून आला. मिळालेल्या माहितीनुसार, कथित भ्रष्टाचार प्रकरणात आलोक यांची ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरू होती.

सहाय्यक संचालक संदीप सिंग यांना नुकतेच सीबीआयने २० लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. या प्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरमध्ये आलोक कुमार रंजन यांचेही नाव होते. अटकेच्या भीतीने त्याने आत्महत्येसारखे पाऊल उचलले असल्याची भीती व्यक्त होत आहे.

पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. सीबीआयशिवाय अंमलबजावणी संचालनालयानेही आलोक रंजनविरोधात गुन्हा दाखल केला होता.

भ्रष्टाचार प्रकरणात आलोक रंजन यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. अटकेच्या भीतीने ते चिंतेत होते. सध्या तरी पोलिसांनी या संपूर्ण घटनेबाबत कोणतेही औपचारिक वक्तव्य जारी केलेले नाही.

काय आहे प्रकरण?

आलोक रंजन यांच्या आत्महत्येचे धागेदोरे मुंबईशी जोडले गेले आहेत. काही महिन्यांपूर्वी ईडीने सहाय्यक संचालक संदीप सिंह यांच्या नेतृत्वाखाली ईडीने एका ज्वेलर्सच्या घरावर छापा टाकला आणि त्याच्या मुलाला अटक करण्याची धमकी दिली.

संदीप सिंग यांनी मुलाला सोडण्यासाठी ज्वेलर्सकडे 20 लाख रुपयांची मागणी केली होती. यानंतर ज्वेलर्सने याबाबत सीबीआयकडे तक्रार केली.

दिल्लीतील लाजपत नगर येथून पैसे घेताना संदीप सिंग यांना सीबीआयने रंगेहात पकडले होते. सीबीआयने संदीपविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला आणि निलंबित करण्यात आले.

आलोक रंजन यांच्यावर आरोप

सीबीआयने संदीप सिंग यांची चौकशी सुरू केली तेव्हा त्यांनी ईडीचे अधिकारी आलोक रंजन यांचे नाव घेतले. संदीप यांच्या जबानीच्या आधारे सीबीआयने आलोक रंजनल यांनाही ताब्यात घेतले. त्यांच्यावर 50 लाखांची लाच घेतल्याचा आरोपही होता.

या सर्व घडामोडी घडत असताना आता आलोक रंजन यांचा मृतदेह रेल्वे रुळांवरून सापडला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही. मात्र प्रथमदर्शनी हे प्रकरण आत्महत्येचे असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar: सत्तारांचे पंख छाटण्यासाठी भाजपचा पहिला वार!;अब्दुल समीर सत्तार यांचा उमेदवारी अर्ज बाद, स्वप्न भंगले; शिवसेनेच्या आमदार जाधव, अण्णासाहेब माने यांनाही धक्का

Latest Marathi News Live Update : जागतिक बाजार घसरले असताना भारतीय शेअर बाजारात तेजी

Beed: दलदल, चिखलातून काढावा लागतोय मार्ग ;रस्ते चिखलात; पुरुषोत्तमपुरीत प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा भाविकांना फटका

Sangli Satara Election: स्वाभिमान दाखविल्यास निकाल बदलेल: जयंत पाटील, शशिकांत शिंदे; नाराजांची मदत घेणार, दोन्ही राजांनी स्वाभिमान दाखवावा

Thalapathy Vijay : मुख्यमंत्री थलपती विजय यांचा केंद्र सरकारसह अदाणींना मोठा दणका; २० हजार कोटींच्या स्मार्ट मीटर प्रकल्प केला बंद

SCROLL FOR NEXT