Chhattisgarh Crime News
Chhattisgarh Crime News esakal
देश

संतापजनक! आठ वर्षाच्या मुलीचं अपहरण करून केला बलात्कार; 14 वर्षाच्या मुलाला अटक

सकाळ डिजिटल टीम

पोलिसांना पकडल्या जाण्याच्या भीतीनं त्यानं मुलीची हत्या करून तिचा मृतदेह लपवून ठेवला होता.

रायपूर : रायपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. इथं आठ वर्षांच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आलीय. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मुलगी 7 डिसेंबरपासून बेपत्ता होती. त्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

14 वर्षीय मुलाला अटक

रायपूर जिल्ह्याचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक (SSP) प्रशांत अग्रवाल यांनी सांगितलं की, विधानसभा स्टेशन परिसरात आठ वर्षांच्या मुलीचं अपहरण, बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी पोलिसांनी 14 वर्षीय मुलाला अटक केली आहे. या महिन्याच्या सात तारखेला शहरातील सद्दू परिसरातून मुलगी अचानक बेपत्ता झाली होती, त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मुलीचा मृतदेह सापडला

पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, 13 डिसेंबर रोजी सद्दू परिसरात एका रिकाम्या जागेत मुलीचा मृतदेह सापडला. त्यानुसार मुलीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले असता, तिचा गळा आवळून तिच्यावर बलात्कार झाल्याचं निष्पन्न झालं. ज्या ठिकाणी मुलीचा मृतदेह सापडला, त्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून गोळा केलेल्या फुटेजचं विश्लेषण करताना पोलिसांना त्याच परिसरात राहणाऱ्या एका मुलावर संशय आला.

मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलाची पीडित मुलीशी मैत्री झाली होती आणि 7 डिसेंबरला त्यानं तिला परिसरात भाजीपाला तोडण्यासाठी बोलावलं होतं. तिथं त्यानं मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला असता, तिनं प्रतिकार केला. यामुळं तो संतापला आणि त्यानं मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केली, असं पोलिसांनी सांगितलं. पकडल्या जाण्याच्या भीतीनं त्यानं मुलीची हत्या करून तिचा मृतदेह लपवून ठेवल्याचंही त्यानं म्हटलं. मुलावर पोक्सो कायदा आणि आयपीसी कलम 363, 302, 201, 376 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीनं दिली गुन्ह्याची कबुली

पोलिसांनी मुलाची चौकशी केली असता, त्यानं आपला गुन्हा मान्य केलाय. मुलीचं अपहरण, खून आणि बलात्काराच्या गुन्ह्यात पोलिसांनी मुलाला पकडलं असून ते या प्रकरणाचा अधिक तपास करत असल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Health Care : भरपूर खाऊनदेखील भूक लागते? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण

CSK vs SRH : बाळ येतंय, मॅच लवकर संपव...! SRH विरुद्धच्या सामन्यादरम्यान साक्षीने धोनीला का केली स्पेशल रिक्वेस्ट?

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

SCROLL FOR NEXT