NCP 
देश

राष्ट्रवादीचे बुरे दिन; राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता जाणार?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर देशात अनेक राजकीय पक्षांना जोरदार धक्का बसला होता. आता निवडणूक आयोगाकडूनही या पक्षांना धक्का बसण्याची शक्यता आहे. आयोगाने अनेक पक्षांना त्यांना दिलेला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून टाकण्याची नोटीस दिली असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचाही समावेश आहे. 

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला आज (गुरुवार) नोटीस दिली आहे. आयोगाच्या या नोटीशीवर राष्ट्रवादीला 20 दिवसांमध्ये उत्तर द्यावे लागणार आहे. उत्तर न आल्यास राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जाऊ शकतो. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जबर धक्का बसला. महाराष्ट्रात या दोन्ही पक्षांच्या फक्त 5 जागा आल्या होत्या. यात काँग्रेसला फक्त 1 जागा मिळाली तर राष्ट्रवादीला चार जागांवर समाधान मानावे लागले होते.

राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविण्यासाठी हे आवश्यक :
- निवडणूक आयोग 1968 च्या नियमानुसार राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देते.
- त्या पक्षाचे लोकसभेत किमान चार खासदार पाहिजे.
- त्या पक्षाला चार किंवा जास्त राज्यांत लोकसभा निवडणुकीत किंवा तेथील विधानसभा निवडणुकांमध्ये सहा टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळाली पाहिजे.
- चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता पाहिजे.

राष्ट्रवादीचे चार खासदार निवडून आले असले तरी इतर नियमांची पुर्तता करणे पक्षाला जमले नाही त्यामुळे पक्ष काय उत्तर देतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली की त्या पक्षाला कार्यालयासाठी मोठ्या शहरांमध्ये कमी किंमतीत जागा आणि देशभर एकच निवडणूक चिन्ह अशा अनेक सुविधा मिळत असतात.

भारतातील सात राष्ट्रीय पक्ष :
भारतीय जनता पक्ष (भाजप)
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (काँग्रेस)
राष्ट्रवादी काँग्रेस
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
भारतीय कम्युनिस्ट पक्ष
बहुजन समाज पक्ष
तृणमुल काँग्रेस 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik VS Suryakumar: २०२४ पासून सूर्यकुमार यादव-हार्दिक पंड्या यांच्यात मतभेद? खळबळजनक अहवालामुळे क्रिकेट विश्वात चर्चा

Thane Video: २६ वर्षांच्या सेवेचा सन्मान; वनाधिकाऱ्यांनी स्वतः वाहन चालवत चालकाला दिला निरोप

Latest Marathi News Update: भांगर बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य संशयित आणि माजी आमदार साओकत मोल्ला यांना एनआयए न्यायालयात हजर केले

Nursery Education: नर्सरीपासूनच इंग्रजीचे शिक्षण अनिवार्य, नवी मुंबई महापालिकेचा निर्णय; पण तज्ज्ञांची वेगळीच भूमिका

Mumbai: मुंबईतील रुग्णांसाठी खुशखबर! आता कमी दरात औषधं मिळणार; जेनेरिकसोबत ब्रँडेड औषधांवरही सवलत

SCROLL FOR NEXT