Breaking News  Sakal
देश

Sudan Clash: सुदानमध्ये लष्कर, पॅरामिलिटरीत तुफान गोळीबार; दुतावासाचा भारतीयांना महत्वाचा सल्ला

या गोळीबारात भारतीयांना दुतावासानं महत्वाचा सल्ला दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : सुदानमध्ये लष्कराचे जवान आणि अर्थसैनिक दलाचे जवान यांच्यामध्ये तुफान गोळीबाराची घटना घडली आहे. यापार्श्वभूमीवर भारतीय दुतावासानं सुदानमधील नागरिकांना महत्वाचा सल्ला दिला आहे. याबाबत दुतावासानं ट्विट करत आवाहन केलं आहे. (Embassy of India in Sudan advises Indians to stay indoors in view of reported firings in country)

उत्तर अफ्रिका खंडातील सुदानची हा सर्वात मोठा अरब देश आहे. या देशाची राजधानी खार्तुम इथं मिलिटरी आणि पॅरामिलिटरी फोर्सच्या जवानांमध्ये झटपट आणि तुफान गोळीबाराची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. यापार्श्वभूमीवर भारतीयांना सावध राहण्याचा सल्ला सुदानमधील भारतीय दुतावासानं दिला आहे. तसेच भारतीय नागरिकांना आपल्या घरातच रहावं, पुढील सल्ला मिळेपर्यंत घराबाहेर पडू नये असंही दुतावासानं म्हटलं आहे.

नेमकं काय घडलंय?

सुदानची राजधानी खार्तुममध्ये लष्कर आणि अर्धसैनिक दलाच्या जवानांमध्ये झटापट पहायला मिळाली. यांनतर दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबारही झाला. स्थानिक लोकांनी हा गोळीबाराचा प्रकार अनुभवला. सुदानचे लष्करी मुख्यालय आणि सेंट्रल खार्तुममध्ये संरक्षण मंत्रालयच्या जवळपास देखील गोळीबाराची माहिती मिळतेय. काही दिवसांपूर्वी सुदानमध्ये अशाच प्रकारे अर्थसैनिक दल आणि रॅपिट सपोर्ट फोर्सच्या जवानांमध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव पहायला मिळाला होता.

विमानतळावर मिळवलं नियंत्रण

अर्धसैनिक रॅपिड फोर्सनं दावा केला की, त्यांनी विमानतळावर ताबा मिळवला आहे. यापूर्वी सांगण्यात येत होतं की, त्यांच्या शिबिरावर हल्ला करण्यात आला आहे. वृत्तसंस्था एएफपीनुसार, रॅपिड सपोर्ट फोर्सच्या जवानांनी सैन्याच्या अनेक शिबिरांवर हल्ला केला, दरम्यान दोन्ही बाजूंकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रजत पाटीदारने टॉस जिंकला, दोन नव्या चेहऱ्यांना दिली संधी; कोण आहे Abhinandan Singh?

Rain Forecast : अचानक महाराष्ट्रासह अनेक राज्यात धो-धो पाऊस का सुरू झालाय? कधी थांबणार, समोर आली महत्वाची माहिती

Ohh Shit... मुंबई इंडियन्सचा उद्या सामना अन् दोन स्टार खेळाडू खेळणार नसल्याची धडकली बातमी, दोघांनी गाजवलाय T20 WC 2026

High Court: विवाहित जोडपी घटस्फोटाशिवाय लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Solapur : उजव्या ऐवजी डाव्या हाताचं बोट कापलं, चिमुकला सांगत होता तरी महिला डॉक्टरने ऑपरेशन केलं; कुटुंबियांचे आरोप

SCROLL FOR NEXT