Rahul Gandhi
Rahul Gandhi sakal
देश

"वीज संकट उद्योग संपवणारे आणि बेरोजगारी वाढवणारे"

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील ७२,०७४ मेगावॅट क्षमतेचे ऊर्जा निर्मिती प्रकल्प कोळशाअभावी बंद पडले असून हे संकट लहान उद्योगांना संपविणारे आणि बेरोजगारी वाढविणारे ठरेल, असा इशारा कॉंग्रेसने दिला आहे. या वीज संकटाचे खापर पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांवर फोडू नये, असा टोलाही कॉंग्रेसने लगावला आहे.

वीज टंचाईच्या मुद्द्यावर कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी फेसबुक पोस्टद्वारे तोफ डागली. २० एप्रिल २०२२ ला आपण मोदी सरकारला विद्वेषाचा बुलडोझर थांबविण्याचे आणि वीजनिर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे आवाहन केले होते. आज देशात कोळसा आणि विजेच्या संकटाने हाहा:कार उडाला आहे. हे संकट लहान उद्योगांना संपवून टाकेल. यामुळे बेरोजगारी आणखी वाढवेल. रेल्वे, मेट्रो सेवा ठप्प झाल्याने नुकसान होईल, असा इशारा राहुल यांनी दिला.

यानंतर कॉंग्रेस प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी सांगितले की, सोळा राज्यांमध्ये दहा तासांची वीज कपात सुरू आहे. यातील १२ राज्ये भाजपशासित आहे. एप्रिलमध्ये ही स्थिती असून अजून मे महिना बाकी आहे. केंद्र खाणीतून कोळसा वीज प्रकल्पापर्यंत पोचवू शकले नाही, त्यामुळे ७२०७४ मेगावॅट क्षमतेचे उर्जा निर्मिती प्रकल्प बंद पडले आहेत. मागणी आणि उपलब्धतेनुसार दर दर्शविणाऱ्या एनर्जी एक्स्चेंजचा हवाला गौरव वल्लभ यांनी दिला.राज्यांना १२ रुपये प्रति यूनिट दराने वीज खरेदी करावी लागत असल्याचाही दावा केला. आता १६०३५ मेगावॅट मागणी असून पुरवठा केवळ २३०४ मेगावॅटचा आहे. ही पूर्तता १२ रुपये प्रति युनिट दराने होत असल्याचे ते म्हणाले.

एप्रिल, मेमध्ये भयंकर उन्हाळा असतो हे सर्वांना माहिती असताना वीज निर्मिती प्रकल्पांना कोळसा का उपलब्ध करून दिला नाही. देशात कोळशाची मागणी २२ लाख टनांची असताना कोळसा मंत्रालय फक्त १६ लाख टनाचा पुरवठा का करत आहे. १७३ औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांपैकी १०६ प्रकल्पांत क्षमतेच्या २५ टक्केच कोळसा उपलब्ध का आहे.

- गौरव वल्लभ, प्रवक्ते, कॉंग्रेस

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT