Ex-BSP MP's son Ashish Pandey
Ex-BSP MP's son Ashish Pandey 
देश

महिलांच्या शौचालयात जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाची गुंडगिरी

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: महिलांच्या शौचालयामध्ये जाणाऱया माजी खासदाराच्या मुलाला एका युवतीने रोखल्यामुळे चिडलेल्या खासदार मुलाने थेट मुलीवर पिस्तूल रोखले. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, नेटिझन्सनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहे. राजधानीतील फाईव्ह स्टार हॉटेल हयात येथे हे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.

देशाच्या राजधानी असलेल्या फाईव्ह स्टार हॉटेल हयात बाहेर हा प्रकार घडला आहे. बहुजन समाज पार्टीचे (बसपा) माजी खासदार राकेश पांडे यांचा मुलगा आशिष पांडे याने युवतीवर पिस्तूल रोखल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. धक्कादायक म्हणजे आशिष पांडे हा महिला शौचालयामध्ये जात होता, त्यावेळी तरुणीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघांमध्ये वाद झाला. यानंतर आशिष थेट मोटारीकडे गेला व पिस्तूल घेऊन आला. युवतीला गोळी मारण्याची धमकी देत त्याने शिवीगाळ केली. यावेळी हॉटेलमधील कर्मचाऱयांनी मध्यस्थी केल्यामुळे वादावर पडदा पडला.

आशिष पांडे हा एका महिलेसोबत दिल्लीतल्या फाईव्ह स्टार हॉटेलात आला होता. हॉटेलमधून बाहेर पडत असताना हा प्रकार घडला. प्रसारमाध्यमांना सीसीटीव्हीमधील क्लिप मिळाल्यानंतर ती व्हायरल झाली. पोलिसांनी व्हिडीओची सत्यता तपासल्यानंतर आशिष पांडेविरोधात स्यू मोटो गुन्हा दाखल केला आहे. आशिष पांडेला अटक करण्यासाठी दिल्ली पोलिसांची पथक लखनौला रवाना झाले आहे.

आशिष पांडेचे वडील राकेश पांडे आंबेडकरनगरमधून बसपाचे खासदार होते. सध्या जलालपूरमधून आशिषचा भाऊ रितेश आमदार आहे. आशिष पांडेचा सख्खा काका माजी आमदार आहे. आशिष पांडे हा बांधकाम व्यावसायिक आहे. राजकीय पार्श्वभूमी व पैशाची मस्ती आल्यामुळे आशिष याने युवतीवर पिस्तूल रोखून गुंडगिरी केली आहे, अशा प्रतिक्रिया नेटिझन्स व्यक्त करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT