Arvind Kejriwal sakal
देश

Arvind Kejriwal Arrest : सीबीआयने केलेल्या अटकेविरोधात केजरीवालांचा दिल्ली हायकोर्टात धाव

Arvind Kejriwal Arrest : सीबीआयकडून अटक झाल्यानंतर विशेष न्यायालयाने केजरीवाल यांची आधी तीन दिवसांसाठी तर त्यानंतर १२ जुलैपर्यंत कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा


नवी दिल्ली, ता. १ ः दिल्लीतील मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) झालेल्या अटकेला आव्हान देत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. केजरीवाल यांना मार्च महिन्यात ईडीने अटक केली होती तर २६ जून रोजी या प्रकरणात त्यांना ‘सीबीआय’कडून अटक झाली होती.

सीबीआयकडून अटक झाल्यानंतर विशेष न्यायालयाने केजरीवाल यांची आधी तीन दिवसांसाठी तर त्यानंतर १२ जुलैपर्यंत कोठडीत रवानगी करण्यात आली होती. विशेष न्यायालयाच्या या आदेशालाही केजरीवाल यांनी आव्हान दिले आहे. मागील महिन्यात कनिष्ठ न्यायालयाने केजरीवाल यांना दिलेला जामीन उच्च न्यायालयाने रद्द केला होता.

‘‘केजरीवाल हे मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणातले मुख्य सूत्रधार असून तपासात ते सहकार्य करीत नाहीत’’ असा आरोप सीबीआयने न्यायालयात केला आहे. जामीन देण्यात आला तर ते साक्षीदारांना प्रभावित करू शकतात, असा सीबीआयचा दावा आहे. ‘‘जुने मद्य धोरण रद्दबातल करून नवे धोरण बनविण्याच्या बदल्यात आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांना शंभर कोटी रुपयांची लाच दक्षिणेतील लॉबीने दिली होती,’’ असे तपास संस्थांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव-राज ठाकरे येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT