Court esakal
देश

Court News: पत्नीकडून घरकामाची अपेक्षा ठेवणे ही क्रूरता असू शकत नाही; हायकोर्टाची टिप्पणी

housework from a wife cannot be cruelty: वैवाहिक संबंध कायम ठेवण्यासाठी पती-पत्नी सोबत राहणे आवश्यक आहे. दोन्ही पक्ष एकत्र राहणे आणि दूर न होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं असतं.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पत्नीकडून घरकामाची अपेक्षा ठेवणे ही क्रूरता असू शकत नाही, अशी टिप्पणी दिल्ली हायकोर्टाने केली आहे. काही प्रकरणांमध्ये पती आर्थिक भार उचलत असतात आणि पत्नी घराची जबाबदारी उचलत असते. त्यामुळे अशा प्रकरणामध्ये महिलेच्या घरकामाला खालच्या दर्जाचे काम समजणे योग्य नाही, असं कोर्ट म्हणालं. (Expecting housework from a wife cannot be cruelty Commentary of the delhi High Court)

न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या पीठाने एका याचिकेवर सुनावणी घेतली. क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट न देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने फेटाळला आहे. कोर्टाने पत्नीकडून होणाऱ्या क्रूरतेच्या आधारावर पतीला घटस्फोट दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोडप्याचे लग्न २००७ मध्ये झाले होते. त्यानंतर २००८ मध्ये त्यांना एक मुलगाही झाला होता.

पतीने दावा केलाय की, पत्नी सुरुवातीपासूनच त्याच्यासोबत आणि त्याच्या कुटुंबासोबत भांडायची. पत्नी कधीही समजून घेण्याच्या मनस्थितीत नसायची. पतीचे म्हणणे कोर्टाने ऐकून घेतलं आहे. कोर्ट म्हणालं की, पती पत्नीच्या इच्छेसमोर झुकला होता. वैवाहिक जीवनाला वाचवण्यासाठी त्याने एक वेगळ्या घराची देखील व्यवस्था केली होती.

पत्नीसाठी दुसऱ्या घराची व्यवस्था

पत्नीसाठी दुसऱ्या घराची व्यवस्था केली असली तरी पती जास्तवेळ घरी राहायचा नाही. त्याचे आई-वडिलांच्या प्रति देखील काही कर्तव्य होते. त्यामुळे तो त्यांना देखील वेळ द्यायचाय, असं कोर्टाने मान्य केलंय. काही काळाने महिलेने विविध कारणं सांगून घर सोडलं आणि ती माहेरी राहायला गेली. महिलेने पतीसोबत आणि सासू-सासऱ्यांसोबत राहण्यास नकार दिला आणि ती माहेरी राहायला गेली.

पतीकडून पूर्ण प्रयत्न

वैवाहिक संबंध कायम ठेवण्यासाठी पती-पत्नी सोबत राहणे आवश्यक आहे. दोन्ही पक्ष एकत्र राहणे आणि दूर न होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचं असतं. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने असा निष्कर्ष काढलाय की, पत्नीचे एकत्रित कुटुंबात राहण्याची कोणतीही इच्छा नाही. महिलेने आपले वैवाहिक कर्तव्य पार पाडले नाहीत, तसेच मुलाला पतीपासून दूर ठेवले. पतीने वेगळ्या घराची व्यवस्था करुन पत्नीला खुश ठेवण्यासाचा पूर्ण प्रयत्न केला. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: फलटणला सर्वात आधुनिक शहर बनवू: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; टीकाटिप्पणीपेक्षा विकास हा माझा अजेंडा!

ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये गोड ट्विस्ट! 5 मिनिटांत घरच्या घरी बनवा विना अंड्याची Brownie, लगेच ट्राय करा

Marathi Career Rashi Bhavishya: आजचा दिवस भाग्यवान! सूर्य–मंगळ संयोगामुळे 'या' राशींना मिळणार करिअर आणि आर्थिक फायदा

अग्रलेख - सरकारी माणिकशोभा!

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं 'Arrest Warrant' घेवून नाशिक पोलिस मुंबईतील लीलावती रूग्णालयात दाखल!

SCROLL FOR NEXT