Crime_Kidnapping
Crime_Kidnapping 
देश

गर्लफ्रेंडसाठी कायपण; भाडेकरुनं 7 महिन्यांच्या बाळाला केलं किडनॅप

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- एका रोमांचक ऑपरेशनदरम्यान दिल्ली पोलिसांनी सात महिन्याच्या मुलाची सुखरुप सुटका केली आहे. एका भाडेकरुने सात महिन्याच्या बाळाचे अपहरण केले होते आणि आई-वडिलांकडून 40 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. 800 मीटरवर येऊन आरोपीचा संपर्क तुटला होता, पण पोलिसांनी हुशारी दाखवत बाळाची सुटका केली. आरोपीने आई-वडिलांना पोलिसांत न जाण्याची धमकी दिली होती. पण, त्यांनी रिस्क घेत पोलिसांना याबाबत कळवलं. पोलिस उपायुक्त परवींदर सिंह यांनी सांगितलं की, दुपारी एकच्या सुमाराच दिल्लीच्या रनहोला पोलिस स्टेशनमध्ये फोन आला की, त्यांच्या सात महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाले आहे. त्यानंतर पोलिस फोन आला होता, त्या घरी पोहोचले. बाळाची आई शिवी कौशिकने सांगितलं की, त्यांचा भाडेकरु प्रियांशु कुमार बाळासोबत खेळण्याचा बहाण्याने घरी आला आणि न कळत बाळाला घेऊन पसार झाला. पियांशु कॉम्प्युटर इंजिनिअर असून तो गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्याकडे भाड्याच्या घरात राहत होता. 

7 तास चालले ऑपरेशन

प्रियांशुने बाळाचे अपहरण केल्यानंतर फोन करत 40 लाखांची मागणी केली. तसेच पोलिसांना कळवल्यास बाळाला मारुन टाकण्याची धमकी दिली. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल करुन घेतला आणि लगेच याप्रकरणात लक्ष घातलं. प्रियांशुला गुंतवून ठेवण्यासाठी विविध युक्त्या करण्यात आल्या. बाळाच्या आई-वडिलांनी पैसे देण्याचे कबुल केले. प्रियांशु वेगवेगळ्या मोबाईलवरुन फोन लावत असल्याने त्याला ट्रक करण्यास अडचण येत होती. 

अपरहणकर्त्याचा विश्वास जिंकण्यात आला

अपरहकर्त्याचा विश्वास जिंकवण्याठी पोलिसांनी आई-वडिलांना थोडी रक्कम देण्यास सांगितलं. यावेळी त्यांनी अपहरणकर्त्याला 40 हजार रुपये देऊन टाकले. काही पैसे मिलाल्यामुळे प्रियांशु थोडा बेफिकीर झाला. त्याला वाटू लागलं की, त्याला सर्व पैसे मिळतील. त्याने एका एटीएमवरुन 40 हजार काढून घेतले. प्रियांशुने कॅब केली होती आणि तो दिल्लीच्या परिसरात फिरत होता. एका ठिकाणी पोलिसांनी त्याला ट्रॅक केलं, पण 800 मीटरवर आल्यानंतर त्याचा संपर्क तुटला. यावेळी पोलिसांनी तो कुठेपर्यंत गेला असेल याचा अंदाज बांधला.  140 मीटरवर आल्यानंतर तो पुन्हा लोकेशनमध्ये दिसू लागला. जवळ असणाऱ्या सर्व कॅब्सची झाडाझडती घेताना त्यांना प्रियांशु एका कॅबमध्ये दिला. यावेळी प्रियांशुने बाळाला कॅबमध्येच ठेवत, धूम ठोकली. बाळ सुखरुप पोलिसांना मिळालं.

गर्लफ्रेंडसाठी केलं अपहरण

टेक्लिकल इंटेलिजन्सच्या मदतीने सहा तासांनी पोलिसांनी प्रियांशुला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, प्रियाशुंने सांगितलं की, त्याने 2018 मध्ये बीटेक डिग्री घेतली आहे.  त्याची कानपूरमध्ये एक गर्लफ्रेंड आले. तिला सतत महागडे गिफ्ट द्यावे लागतात. त्यासाठी त्याला पैशांठी गरज होती. त्यामुळे त्याने बाळाचे अपहरण केले आणि 40 लाखांची मागणी केली. जेणेकरुन त्याला गर्लफेंडसोबत कानपूरमध्ये राहता यावं. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT