fani
fani 
देश

Cyclone Fani : फनी येतंय! ओडिशात आपत्ती व्यवस्थापन युद्धपातळीवर सज्ज

वृत्तसंस्था

पुरी : फनी हे चक्रीवदळ अगदी काही तासांतच पुरी किनारपट्टीला धडकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ओडीशातील भुवनेश्वर, पुरी, चिल्का येथे वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. तर एनडीआरएफचे जवान, कोस्टगार्ड व स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभाग युद्धपातळीवर या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. फनी किमान 180 ते 200 ताशी किमी वेगाने पुरी किनारपट्टीकडे येत आहे.

'फनी' चक्रीवादळ पुरी पासून 60 किमी अंतरवार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली. त्यामुळे आज (ता. 3) दुपारी 10 ते 12 च्या दरम्यान हे वादळ पुरी किनारपट्टीला धडकू शकते. किनारपट्टीवरील 11 लाख नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले असूनस त्यांच्यासाठी 900 आश्रयस्थाने तयार करण्यात आली आहेत. येथील शाळा-महाविद्य़ालयांना सुट्टी देण्यात आली असून कोणालाही घराबाहेर पडण्यास मनाई आहे. कोलकाता व भुवनेश्वर विमानतळ बंद ठेवण्यात आले आहेत, तर 233 रेल्वेगाड्या थांबवल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापन विभागाशी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बैठक झाली. नागरिकांची सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापनाकडे ते लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले. धडकण्यापूर्वीच फनीने रौद्र रूप धारण केल्याने मोठ्या प्रमाणात सुरक्षिततेसाठी सर्व सज्ज असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Met Gala 2024 : मेट गालाची थीम कोण ठरवत? जाणून घ्या यंदाची थीम आणि बरंच काही..!

SRH vs LSG IPL 2024 : प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी चढाओढ! सनरायझर्स हैदराबाद-लखनौ आज आमने-सामने

Latest Marathi News Live Update : केरळमध्ये हत्तीच्या हल्ल्यात मल्याळम वृत्तवाहिनीचा कॅमेरामन ठार

SCROLL FOR NEXT