Viral Video: लिफ्टमध्येच कुत्र्याचा मुलीवर हल्ला, चावा घेताच...; पाहा अंगावर काटा आणणार व्हिडिओ

Dog Attack In Lift: दुसऱ्या युजरने कुत्र्याचा बचाव करताना लिहिले, "मोठा बाऊ करू नका. कोणताही हल्ला झाला नाही.
Delhi Society Dog Attack In Lift
Delhi Society Dog Attack In LiftEsakal

अलिकडे शहरी भागांतील सोसायट्यांमध्ये कुत्र्यांकडून माणसांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. असे प्रकार घडत असल्याचे बातम्या आपण सतत पाहत असतो. आता दिल्लीतून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

येथिल नोएडाच्या सेक्टर 107 मधील लोटस 300 सोसायटीच्या लिफ्टमध्ये कुत्र्याने एका लहाण मुलीवर हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक मुलगी लिफ्टमधून बाहेर पडणार तेवढ्यात एक कुत्रा आत येतो आणि मुलीचा चावा घेतो. तेवढ्यात लिफ्टपाशी असलेली एक व्यक्ती त्या कुत्र्याला बाहेर काढते.

या हल्ल्यानंतर हादरलेली आणि वेदनेने ग्रासलेली मुलगी लिफ्टमध्ये एकटीच होती. ती रडत रडत तिच्या टी-शर्टने तिचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करत होती. शेवटी ती तळमजल्यावरच्या लिफ्टमधून बाहेर पडते. दरम्यान, हौसिंग सोसायटीने या घटनेबाबत अद्याप कोणतेही निवेदन दिलेले नाही.

Delhi Society Dog Attack In Lift
Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

मात्र, या घटनेच्या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. संभाव्य अनुचित घटनेबद्दल भीती व्यक्त करणाऱ्या एका युजरने कमेंट केली की, "मुलगी लिफ्टमध्ये एकटीच असती तर काय झाले असते या विचारानेच मी घाबरलोय."

दुसऱ्या युजरने कुत्र्याचा बचाव करताना लिहिले, "मोठा बाऊ करू नका. कोणताही हल्ला झाला नाही. होय, मालकाने सावध राहून कुत्र्यांना ताब्यात ठेवण्याची गरज आहे. कुत्र्यांबद्दल इतरांच्या भीती किंवा अस्वस्थतेचा आदर करा. पण यावेळी कोणताही हल्ला झाला नाही. आणि हा एक लहान कुत्रा आहे, तो पिल्लासारखा दिसतोय."

Delhi Society Dog Attack In Lift
Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

अलीकडेच, मार्चमध्ये, केंद्र सरकारने अशा घटनांबद्दल वाढत्या चिंतेला उपाय म्हणून 23 'हिंसक कुत्र्यांच्या' जातींच्या विक्री आणि प्रजननावर बंदी घालण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. या कुत्र्यांच्या जातींमध्ये पिटबुल टेरियर्स, अमेरिकन बुलडॉग्स, रॉटवेलर्स आणि मास्टिफ यांचा समावेश आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com