देश

फराक्का एक्‍स्प्रेसचे डबे घसरून 5 ठार 

पीटीआय

लखनौ/नवी दिल्ली (पीटीआय) : नवी दिल्लीच्या दिशेने जाणाऱ्या न्यू फराक्का एक्‍स्प्रेसचे डबे आज रायबरेलीजवळ घसरून झालेल्या अपघातात पाच जण ठार झाले, तर अन्य नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. ही गाडी पश्‍चिम बंगालमधील माल्डाहून नवी दिल्लीच्या दिशेने चालली होती. या अपघातामध्ये 30 ते 35 लोक किरकोळ जखमी झाल्याचे समजते. 

या अपघातातील जखमींवर लखनौमधील रुग्णालयात उपचार सुरू असून, अन्य काही जखमींना रायबरेलीला हलविण्यात आले आहेत. दरम्यान या अपघातानंतर रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली होती. काही प्रवाशांना सुरक्षितस्थळी नेण्यासाठी प्रशासनाकडून खासगी गाड्यांबरोबर पर्याय रेल्वेची सोय करण्यात आली होती. रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्या प्रवाशांना स्थानिक प्रशासनाकडून नाश्‍ताही देण्यात आला. दरम्यान या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपये, जखमींना 1 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही मृतांच्या नातेवाइकांना राज्य सरकारकडून 2 लाख आणि गंभीर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Gavit: शिवसेनेचा खासदार भाजपच्या गळाला, देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरण; पाचव्या आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT