देश

कॉंग्रेसची 'दणदणीत' कर्जमाफी; शेतकर्‍यांचा तब्बल पाच ते दहा रुपयांचा फायदा!

वृत्तसंस्था

भोपाळ- मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने सरकार स्थापन केल्यावर तातडीने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु ही कर्जमाफी फसवी असल्याचे आता स्पष्ट होताना दिसत आहे. कुणाचे पाच तर कुणाचे दहा रुपये माफ झाले असल्याची स्थिती मध्य प्रदेशात दिसत आहे.

निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याची घोषणाही काँग्रेस नेत्यांनी यावेळी केली होती. मात्र, या कर्जमाफीचा लाभ घेताना शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकारी कार्यालयांमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांच्या नावाच्या ज्या याद्या लागल्या आहेत, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावासमोर 30 रुपये तर काहींच्या नावासमोर वालासमोर 100 रुपये माफ झाल्याचे दिसत आहेत. सरकारने आणलेल्या जय किसान कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज भरले होते. कमलनाथ यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. 

सरकारी बँकांमध्ये कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची याद्या इंग्रजीमध्ये प्रसिद्ध झाल्यानेही शेतकऱ्यांना आपले नाव आहे किंवा नाही हे जाणून घेण्यात अनंत अडचणी येत आहेत. मध्य प्रदेशमधील खरगौन येथील शेतकरी या किरकोळ कर्जमाफीमुळे त्रस्त आहेत. येथील अनेक शेतकऱ्यांचे 25, 50, 150, 180 आणि 300 रुपयांपर्यंतचे कर्ज माफ झाले आहे.

दरम्यान, बँकांकडे हिंदी सॉफ्टवेअर नसल्याने कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी इंग्रजीतून प्रसिद्ध केली, असा दावा बँक अधिकाऱ्यांनी केला आहे. कर्जमाफीच्या या गोंधळावर भाजपने जोरदार टीका केली आहे. हे सरकार कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास देत आहे. याचे परिणाम काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत भोगावे लागतील, असे भाजपने म्हटले आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT