Farooq Abdullah
Farooq Abdullah 
देश

Farooq Abdullah : २४ कोटी मुसलमानांना चीनमध्ये पाठवणार का? फारुख अब्दुल्लांचा मोदी सरकारला सवाल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - Farooq Abdullah Slams Centre नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी शनिवारी (11 मार्च 2023) पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. देशाची धार्मिक आधारावर विभागणी करू नका, अशी मागणी अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारला केली.

खोऱ्यातील बिगर भाजप पक्षांच्या बैठकीनंतर जम्मूत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अब्दुल्ला म्हणाले की, समुदायांना एकमेकांच्या विरोधात उभे केले जाऊ नये. भीती आणि द्वेषाचे राजकारण नवीन नाही. पण तुम्ही २२-२४ कोटी मुस्लिमांचे काय करणार? तुम्ही त्यांना समुद्रात फेकाल की चीनला पाठवणार, असा सवालही अब्दुल्ला यांनी केला.

'गांधीजी रामराज्याबद्दल बोलत होते. रामराज्य म्हणजे कल्याणकारी राज्य जिथे सर्वांना समान संधी मिळतील आणि कोणाशीही भेदभाव केला जाणार नाही. आपण सर्वांनी गांधीजींच्या तत्त्वांचे पालन केले पाहिजे.

अब्दुल्ला यांनी दिवसभरात डझनभर पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरात लवकर विधानसभा निवडणुका आणि राज्याचा दर्जा बहाल करण्यासाठी दिल्लीत निवडणूक आयोगाची भेट घेण्याचा निर्णय घेऊन या बैठकीचा समारोप झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT