BJP MLA Bunty Bhangdia News : भाजप आमदार बंटी भांगडियांवर विनयभंगाचा गुन्हा; काय आहे प्रकरण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP MLA Bunty Bhangdia News

BJP MLA Bunty Bhangdia : भाजप आमदार बंटी भांगडियांवर विनयभंगाचा गुन्हा; काय आहे प्रकरण?

BJP MLA Bunty Bhangdia News : चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर विधानभा मतदारसंघातील भाजप आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिमुर पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर मतदारसंघाचे भाजप (BJP) आमदार बंटी भांगडिया आणि त्यांच्या 8 कार्यकर्त्यांवर मारहाण, शिवीगाळ आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल दाखल झाला आहे. तर आमदार भांगडिया यांच्या तक्रारीवरून फिर्यादी साईनाथ बुटके यांच्यावरही शिवीगाळ आणि बदनामी केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकारामुळे भाजप आणि काँग्रेस अशा दोन्हीकडील कार्यकर्त्यांमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

नेमकं काय झालं होतं?

साईनाथ बुटके या काँग्रेस समर्थकाने त्याच्या व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवलं होतं. ज्यामध्ये भाजप आमदार बंटी भांगडीया यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची कथित बदनामी करणारा मजकूर पोस्ट केला होता. त्यामुळे संतापलेल्या भांगडीया आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री साईनाथ बुटके यांना घरी जाऊन मारहाण केली तसेच त्यांच्या पत्नीला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.

महिलेने भांगडीया यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, साईनाथ यांचा मोठा भाऊ गजानन बुटके हे काँग्रेस पक्ष चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस या पदावर कार्यरत आहेत. ११ तारखेच्या दिवशी सायंकळी सात-साडेसातच्या सुमारास भाजपचे आमदार किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडिया हे आपल्या काही कार्यकर्त्यांना घेऊन बुटके यांच्या घराबाहेर आले.

यानंतर बुटके यांना शिवीगाळ केली.तसेच घरात जबरदस्तीने शिरले व साईनाथ यांना मारहाण केली. मारहाण करतच त्यांना घराबाहेर ओढून आणले. या मारहाणीला विरोध करताना विनयभंग केला गेला, असा आरोपपिडीत महिलेने केला आहे.

आमदार भांगडिया यांच्या कार्यकर्त्यांनी पीडित महिला, साईनाथ आणि त्यांच्या दोन्ही लहान मुलांना देखील मारहाण करण्यात आली असेही महिलेने तक्रारीत म्हटले आहे.

पिडितेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर भाजप आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्यासह, त्यांच्या १५ ते २० कार्यकर्त्यांविरूद्ध कलम ३५४ अन्वये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Bjp