up baghpat
up baghpat 
देश

VIDEO - दुकानदारांचा रस्त्यात राडा; पाणीपुरी खायला आलेल्यांच्या काळजाचं झालं 'पाणी-पाणी'

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ - उत्तर प्रदेशातील बडौत इथं सोमवारी पाणीपुरी आणि ज्यूस विक्री करणाऱ्या दुकानदारांमध्यो जोरदार राडा झाला. ग्राहकांवरून दुकानदार एकमेकांना भिडले आणि प्रकरण थेट मारहाणीवर पोहोचलं. दोन्ही दुकानांच्या मालकांनी आणि कर्मचाऱ्यांनी एकमेकांना लाथा, बुक्क्यांसह काठीने मारहाण केली. 

घटनास्थळावर या प्रकारामुळे गोंधळाचं वातावरण तयार झालं होतं. याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी आले आणि त्यांनी वातावरण शांत केलं. पोलिसांनी दोन्ही बाजूच्या आठ जणांना पकडून पोलिस ठाण्यात आणलं आहे. या प्रकरणाची आता पोलिस चौकशी करत आहेत.

बडौतनगर इथं गेस्ट हाउसजवळ दुर्गा फ्रूट ज्यूस आणि नवदुर्गा पाणापुरी सेंटर विक्रेत्यांमध्ये ग्राहकांवरून शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर दोघांमधला वाद चक्क हाणामारीवर आला. तेव्हा विक्रेते आणि दुकानातील कर्मचारी काठी, सळी आणि हाताला लागेल ते घेऊन एकमेकांना मारण्यासाठी धावले. भर रस्त्यात आठजण एकमेकांना मारत होते. 

बाजारात रस्त्यावर सुरु असलेल्या या हाणामारीने काही काळ गोंधळही निर्माण झाला. पाणीपुरी खायला आलेल्या ग्राहकांचीही अवस्था या दोघांच्या भांडणात अवघड झाली. यावेळी मारहाण करणाऱ्या दोन्ही दुकानदारांसह त्यांच्या कर्मचाऱ्यांनी एकमेकांना रस्त्यावर लोळवलं. 

सीओ एमएस रावत यांनी सांगितलं की, दोन्ही पाणीपुरीची दुकाने होती. ग्राहकांना बोलावण्यावरून दोघांमध्ये वाद सुरु झाला. यावेळी दोघांमध्ये झालेल्या वादात जवळपास 12 हून अधिक लोक जखमी झाले. याप्रकरणी दोन्ही बाजूच्या लोकांनी एकमेकांविरोधात फिर्याद दिली आहे. तर पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs SRH Live IPL 2024 : पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली; चेन्नईला चेन्नईत मात देण्यासाठी सज्ज

Buss Accident : उत्तर प्रदेशमध्ये भीषण बस अपघात; ट्रकच्या वेगाने बस कापून निघाली, सात जणांचा मृत्यू

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

SCROLL FOR NEXT