Find out vikas Dubeys family tree up news
Find out vikas Dubeys family tree up news 
देश

विकास दुबेचा मुलगा शिकतोय परदेशात; जाणून घ्या दुबेच्या कुटुंबाची कुंडली

कार्तिक पुजारी (Kartik Pujarai)

नवी दिल्ली-  उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबेला गुरुवारी मध्य प्रदेशात पोलिसांनी अटक केली. गेल्या सहा दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. दुबे प्रकरणी पोलिसांनी त्याचे कुटुंबीय आणि मित्रमंडळींची कसून चौकशी सुरु केली होती. विकास दुबेच्या कुटुंबाची फारशी माहिती कोणाकडेही उपलब्ध नव्हती. गेल्या सहा दिवसांत पत्रकारांनी दुबेचे राहण्याचे ठिकाण चौबेपुर आणि कानपूर, लखनौ येथे माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. यातून विकास दुबे आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावावर गडगंज संपत्ती असल्याचं स्पष्ट झालं आहे. याअनुषंगाने विकास दुबेच्या कुटुंबात कोण-कोण आहेत हे आपण पाहुयात...

दफन करायला गेले आणि बाळं रडू लागलं!
विकास दुबेचे वडील रामकुमार दुबे यांनी पोलिसांना खोटी माहिती दिली होती. रक्तपाताच्या दिवशी विकास गावात नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पण त्यांनी पोलिसांची दिशाभूल केली होती. विकासची आई सरला देवी दुबे यांनी मुलाला गेल्या काही महिन्यांपासून पाहिलं नसल्याचं म्हटलं आहे. सरला देवी त्यांचा दुसरा मुलगा दिपू दुबे आणि सून अंजली दुबे यांच्यासोबत राहतात. गावकऱ्यांनी पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार, दिपू दुबे हा भाऊ विकास दुबे याला (स्थावर मालमत्ता) रिअल इस्टेटच्या व्यवसायात मदत करत होता. विकासला आणखी एक अविनाश नावाचा लहान भाऊ होता, तो काही दिवसांपूर्वी गुढपद्धतीने मेलेल्या अवस्थेत आढळला होता.

पत्नी आणि मुले-

पॉल बनून महाकाल मंदिरात पोहोचला होता विकास दुबे
विकास दुबेची पत्नी रिचा त्याच्यासोबतच राहायची. शिवाय राजकारणातही तिचा शिरकाव होता. रिचा विकास दुबेच्या एका मित्राची बहीण आहे. या दोघांचे 25 वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्यांना आकाश आणि शानू नावाचे दोन मुलं आहेत. मोठा मुलगा आकाश हा परदेशात शिकतो. तो एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. तर लहान मुलगा शानू  लखनौमधील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. शानू आपल्या आईसोबत लखनौमध्ये राहतो. विकासची आजीही त्यांच्यासोबत राहते.

विकासला तीन बहिणी होत्या, त्यातील दोघींचा लग्नानंतर मृत्यू झाला. चंद्रकांता दुबे ही त्याची एकमेव बहीण शिवली येथे तिच्या पतीसोबत राहते. विकास दुबे फरार झाल्यानंतर पोलिसांनी चंद्रकांता आणि तिच्या पतीशी कसून चौकशी केली होती. चंद्रकांता हिने विकास दुबे याच्यासोबत मालमत्तेवरुन आपलं वैर असल्याचं सांगितलं आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून त्याला भेटले नसल्याचं म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : थंडा थंडा कूल कूल, विद्यार्थ्यांसाठी शाळेने बनवला वर्गातच स्विमिंग पूल

SCROLL FOR NEXT