Devendra Fadnvis
Devendra Fadnvis 
देश

सचिन वाझेंना ऑपरेट करणाऱ्या सरकारमधील व्यक्तीला शोधून काढा - फडणवीस

सकाळ डिजिटल टीम

मनसुख हिरेन (Mansookh Hiren) प्रकरणाचा छडा लावायचा असेल तर एपीआय सचिन वाझे (Sachin Waze) यांना ऑपरेट करणारी राजकीय व्यक्ती कोण आहे हे शोधून काढा, असं आवाहन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी तपास यंत्रणांना केलं आहे. दिल्ली येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

फडणवीस म्हणाले, "अनेक वादग्रस्त प्रकरणांचा मोठा इतिहास असणाऱ्या व्यक्तीला सरकारने इतक्या महत्वाच्या पदावर बसवलं म्हणजेच सरकारची अशी काहीतरी महत्वाची गोष्ट आहे ज्यामुळे सरकारचा नाईलाज आहे. तसेच ज्या प्रकारे आपले मुख्यमंत्री वाझे यांची पाठराखण करतात. तसेच सरकारने ज्या प्रकारे विधीमंडळात त्यांचं समर्थन केलं, त्यावरुन हे स्पष्ट होतं. जर माझ्याकडे इतके पुरावे नसते तर वाझेंना सरकारनं महात्माचं ठरवलं असतं. वाझे ओसामा बिन लादेन आहेत का? असा प्रश्नही सरकारने केला होता. त्यामुळे मला वाटतं की या प्रकरणाच्या मुळाशी जावं लागेल तसेच ज्या हेतूसाठी वाझेंना सरकारने महत्वाच्यापदी  बसवलं. त्याचा याच्याशी काय संबंध आहे? याचा देखील तपास एजन्सीजना शोध घ्यावा, त्यानंतर ही केस सहज सुटेल" 

परमबीर सिंह (Panmbir Singh) आणि सचिन वाझे फार छोटे लोक आहेत. यांचं नाव घेऊन ही अडचण कधीही दूर होणार नाही. यांच्या मागे कोणाचा हात आहे हे याचा तपास व्हायला हवा. सचिन वाझेंना ऑपरेट करणारे काही लोक सरकारमध्ये बसले आहेत. तुम्ही परमबीर सिंह यांची बदली केलीत पण या प्रकणाला केवळ त्यांना जबाबदार धरता येणार नाही. वाझेंना ऑपरेट करणाऱ्या लोकांची चौकशी कोण करणार? असा सवाल फडणवीसांनी यावेळी केला.    
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: मोदींनी गोड बोलून ठाकरेसेनेसाठी खिडकी उघडली? उद्धव ठाकरेंनी भाजपला पाठिंबा देण्याबद्दल दिलं उत्तर

Prajwal Revanna Scandal: 'माझ्या आईवर बलात्कार केला अन् व्हिडिओ कॉलवर मला...'; प्रज्वल रेवन्ना स्कँडलमधील पीडितेने सांगितली आपबीती

Maharashtra Lok Sabha 2024 phase 4 Election Voting LIVE : लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा; सकाळी नऊ वाजेपर्यंत राज्यात 6.45% मतदान

RCB Qualification Scenario : RCB प्ले ऑफमध्ये जाणार? 18 तारखेला, 18 रन्स, 18 ओव्हर्स अन् चेन्नईचा खल्लास खेळ; समजून घ्या गणित

Lok Sabha Voting: मतदानाला सुरुवात होताच EVM मध्ये बिघाड, पुण्यासह, संभाजीनगरमध्ये मतदार खोळंबले

SCROLL FOR NEXT