

NDA leaders celebrate after securing a decisive majority in Rajya Sabha, strengthening their position to pass key legislative bills.
esakal
राज्यसभेच्या ३७ जागांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये एनडीए ने प्रचंड यश संपादन केले आहे. काल ज्या ११ जागांसाठी मतदान झाले, त्यापैकी ९ जागा एनडीएने जिंकल्या. बिहार आणि ओडिशामध्ये पक्षाने प्रत्येकी एका अतिरिक्त जागेची भर घातली, तर हरियाणामध्ये अत्यंत अटीतटीच्या लढतीनंतर पक्षाच्या जागांच्या संख्येत आणखी एका जागेची भर पडली. २६ जागांसाठी निवडणुका बिनविरोध पार पडल्या, ज्यापैकी १३ जागा एनडीए ने जिंकल्या. अशा प्रकारे, ३७ पैकी २२ जागा जिंकून एनडीएने ने एक मोठा विजय मिळवला आहे. विरोधी पक्षांनी १५ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेससाठी दिलाशाची बाब म्हणजे, राज्यसभेतील 'विरोधी पक्षनेते' पद त्यांच्याकडेच कायम राहणार आहे.