Offensive Post on Shivling
Offensive Post on Shivling sakal
देश

शिवलिंगावर आक्षेपार्ह पोस्ट करणं भोवलं! प्राध्यापकाविरोधात गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : हिंदू महाविद्यालयाचे प्राध्यापकांनी शिवलिंगाबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट (Offensive Post on Shivling) केली होती. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर धरले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

रतन लाल असे या प्राध्यपकाचे नाव असून ते दिल्लीतील हिंदी महाविद्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याच्या दाव्याचा संदर्भ देत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राध्यापक रतन लाल यांनी मंगळवारी एक फोटो शेअर केला असून त्यावर आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी केली आहे. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवलिंगावरील आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यानंतर प्राध्यापकांना धमक्या दिल्या जात आहेत. त्यानंतर त्यांनी पोलिसांना संरक्षण मागितले आहे. माझी पोस्ट योग्य असून मला पोलिसांकडून कोणतीही नोटीस मिळाली नाही. मला नोटीस मिळाली तर मी त्यांना सहकार्य करेन. मी टीका केलेली नाही. मी माझं निरीक्षण नोंदवलं आहे. आपल्या देशात कोणत्याही गोष्टीबद्दल बोललं की धार्मिक भावना दुखावल्या जातात, असं त्यांनी एका माध्यमासोबत बोलताना म्हटलं आहे.

दरम्यान, एआयएमआयएमचे प्रवक्ते दानिश कुरेशी यांनी सोशल मीडियावर शिवलिंगाबाबत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. यानंतर विश्व हिंदू परिषदेनं त्यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार अहमदाबादच्या सायबर क्राइम ब्रँचनं दानिश कुरेशी यांना अटक केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT