ज्ञानवापी मशिद : वजूखाना नऊ कुलपांनी सील, CRPF कडे सुरक्षा; अमित शहा मैदानात

ही सुरक्षा दोन शिफ्टमध्ये केली जाणार असून, प्रत्येक शिफ्टमध्ये दोन जवान तैनात राहणार आहेत.
Varanasi Court on Gyanvapi Mosque Case
Varanasi Court on Gyanvapi Mosque Casesakal

ज्ञानवापी मशिद : वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Mosque) वजूखाना (vazukhana) प्रशासनाने ९ कुलपं ठोकून सील केले आहे. तसेच याच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफकडे सोपवण्यात आली आहे. सीआरपीएफचे दोन जवान 24 तास वजूखान्याचे रक्षण करणार आहेत. ही सुरक्षा दोन शिफ्टमध्ये केली जाणार असून, प्रत्येक शिफ्टमध्ये दोन जवान सुरक्षेसाठी तैनात राहणार आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्व्हेक्षणादरम्यान, वजूखाना असलेल्या ठिकाणी एक सरोवर तसेच शिवलिंग आढळून आल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे. मात्र, वजूखान्यात शिवलिंग नसून कारंजे सापडल्याचे मुस्लिम बाजूचे म्हणणे आहे. (Gyanvapi Mosque News In Marathi)

Varanasi Court on Gyanvapi Mosque Case
मुंडे भाऊ-बहिणींची मंचावर खोडकर 'टोले'बाजी; उपस्थितांची मने जिंकली

वजूखान्याचा आणखी एक व्हिडिओ

दरम्यान, मशिदीच्या (Mosque) वजूखानाशी संबंधित आणखी एक व्हिडिओ समोर आला असून, दुसऱ्यांदा समोर आलेला व्हिडिओदेखील जुना असल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत यासंबंधी दोन व्हिडिओ व्हायरल झाले असून, दोन्ही व्हिडिओ एक ते दोन महिने जुने असल्याचे प्रशासनाचे म्हणणे असून, व्हिडिओमध्ये दिसत असलेली आकृती खरंच शिवलिंग (Shivling) आहे की कारंजं? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हिंदू पक्ष याला शिवलिंग म्हणत आहे, तर मुस्लिम बाजू त्याला कारंजा म्हणत आहे.

Varanasi Court on Gyanvapi Mosque Case
'मध्य प्रदेशला OBC आरक्षण मिळालं; महाराष्ट्राच्या आशा पल्लवित'

न्यायालयात नवीन अर्ज

ज्ञानवापी मशिदीच्या पूर्वेला नंदीजींच्या समोर व्यासजींच्या तळघरात तात्पुरती भिंत आहे, ती काढून शिवलिंगापर्यंत जाण्यासाठी मार्ग तयार करावा, असे न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या नव्या अर्जात नमूद करण्यात आले आहे. तसेच शिवलिंगाच्या ठिकाणाभोवतीचा ढिगारा हटवण्याची आणि ज्या ठिकाणी शिवलिंग आढळून आले आहे तेथे पूजेसाठी परवानगी देण्याची मागणी याचिकर्त्या महिलेने केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com