Tata Company fire broke out 
देश

Fire Erupted at Tata Company: तामिळनाडूतील टाटा इलेक्टॉनिक्सच्या प्लँटला भीषण आग; कंपनीत होते 4,500 कर्मचारी

Fire erupted at Tata Electronics Private Limited: आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. अद्याप यात जीवितहानीचे कोणतेही वृत्त नाही.

कार्तिक पुजारी

चेन्नई- तामिळनाडूमधील कृष्णगिरी जिल्ह्यातील उड्डानपल्लीतील टाटा इलेक्टॉनिक्समधील प्लँटला (Tata Electronics Private Limited (TEPL)) भीषण आग लागली आहे. शनिवारी सकाळी ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. अद्याप यात जीवितहानीचे कोणतेही वृत्त नाही. 'टाइम्स ऑफ इंडिया'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्लँटमध्ये मोबाईल फोन उपकरणांचे काम सुरु होते. आगीची चाहुल लागताच योग्य पाऊल उचलत सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या आल्या आहेत. आग विझवण्याचे काम सुरु आहे. माहितीनुसार, TEPL कंपनी iPhones चे विविध पार्ट बनवण्याच्या कामात गुंतलेली आहे.

आकाशात दिसून आले धुराचे लोट

कंपनीमध्ये जवळपास ४,५०० कर्मचारी विविध शिफ्टमध्ये काम करतात. विशेष म्हणजे कंपनीमध्ये जवळपास ८० टक्के महिला कर्मचारी आहेत. पेंटिंग युनिटमध्ये ही आग लागली असं सांगितलं जातं. सकाळी साडेपाचच्या सुमारास ही आग लागली. तीन कर्मचाऱ्यांना श्वास घेण्यास अडथळा जाणवत होतो, त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT