देश

Crime News : पत्रकाराच्या हत्येनंतर आणखी एका साक्षीदाराची हत्या; निवृत्त शिक्षकावर झाडल्या गोळ्या

सकाळ डिजिटल टीम

Crime News : बेरुसारयमध्ये एका निवृत्त शिक्षकाची भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नुकताच पत्रकार विमल यादव याचा एका खटल्याचा साक्षीदार असल्यामुळे खून करण्यात आला होता. आता या शिक्षकाचा हि त्याच कारणामुळे खून करण्यात आला असल्याचे म्हटले जात आहे.

दोन वर्षांपूर्वी या निवृत्त शिक्षकाच्या मुलाचा खून झाला होता. आपल्या मुलाला या निवृत्त शिक्षकाला न्याय मिळवून द्यायचा होता. खुन्याला शिक्षा द्यायची होती. मात्र आता गुन्हेगारांनी संबंधित शिक्षकालाच भर दिवसा गोळ्या घालून ठार केले आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

जवाहर चौधरी असे या मृत व्यक्तीचे नाव असून ही घटना बछवारा पोलीस स्टेशन हद्दीत फातेहा हॉल्ट जवळ घडली घडली आहे. दोन वर्षांपूर्वी निवृत्त शिक्षकाच्या लहान मुलाची गुन्हेगारांनी हत्या केली होती. यावेळी यांच्या मुलावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपींना पकडण्यासाठी छापेमारी सुरू आहे. मुलाच्या मारेकरांनी ही घटना घडवून आणण्याचा आरोपही होत आहे. आम्ही याबाबत तपास करत आहोत. काही संशयितांची चौकशी सुरू आहे.

जवाहर चौधरी हे मॉर्निंग वॉकला निघाले असताना दुचाकीस्वार गुन्हेगारांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळी लागताच ते खाली पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुलाच्या हत्याप्रकरणी ते साक्ष देणार होते. यामुळे त्यांचा खून करण्यात आला असल्याचे कुटुंबाचे म्हणणे आहे.

या घटनेनंतर लोक पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. या प्रकरणातील गुन्हेगारांना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT