Internet sakal media
देश

दिल्लीसह 'या' सहा ते आठ शहरांमध्ये फाईव्ह जी; वाचा सविस्तर माहिती

पुढील वर्षाच्या मध्यात सुरु होण्याची शक्यता

कृष्ण जोशी

मुंबई : मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाटा, बंगळुरू, गुरुग्राम, हैदराबाद, अहमदाबाद या शहरात प्रथम फाईव्ह जी सेवा (5G internet facility) सुरु करण्यास दूरसंचार विभागाने (telecommunication permission) संमती दिली आहे. पुढील वर्षाच्या मध्यास ही सेवा सुरु होण्याचा अंदाज आहे. ज्या शहरांमध्ये फाईव्ह जी सेवेच्या चाचण्या सुरु (5G test) आहेत तेथे ही सेवा टप्प्याटप्प्याने सुरु होईल. (Five G internet facility in various cities soon as telecommunication permission granted nss91)

भारती एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया (व्ही) या कंपन्यांतर्फे या शहरांसह चंदीगड, जामनगर, चेन्नै, लखनौ, गांधीनगर या शहरांमध्ये या सेवेच्या चाचण्या सुरु आहेत. विभागातर्फे पुढीलवर्षात एप्रिलपर्यंत फाईव्ह जी स्पेक्ट्रम चा लिलाव केला जाईल अशी शक्यता आहे. यासंदर्भात टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथॉरिटीच्या (ट्राय) शिफारशींची प्रतीक्षा विभागाला आहे. ट्राय ने यापूर्वीच यासंदर्भातील फाईव्हजी च्या किमती, लिलावातील मुद्दे इ. बाबत कंपन्यांकडून सूचना मागविल्या आहेत.

सरकारने नुकतीच मोबाईल कंपन्यांना वाढता खर्च भागविण्यासाठी 20 ते 25 टक्के दरवाढ करण्यास संमती दिली आहे. तसेच जुना कर भरण्यासाठीही वेळ दिला आहे. पुढील वर्षी या कंपन्यांना नफ्यात 40 टक्के वाढ होण्याची अपेक्षा आहे. या कारणांमुळे त्यांना फाईव्ह जी सेवा सुरु करण्यासाठी गुंतवणुक करणे सोपे होईल, असा अंदाज आहे. या कंपन्यांचा कामचलाऊ नफा सध्याच्या पाऊण लाखकोटींवरून पुढीलवर्षी एक लाखकोटींवर जाईल अशी अपेक्षा आहे.

महानगरांमध्ये फाईव्ह जी स्पेक्ट्रम मिळविण्यासाठी या कंपन्यांना अंदाजे सत्तर हजार कोटी रुपये मोजावे लागतील, असे बोलले जात आहे. तर या उद्योगावरील कर्जदेखील यावर्षीच्या मार्चअखेरीस चार लाखकोटींवर गेले आहे. दूरसंचार विभागाकडील आकडेवारीनुसार देशात मार्च 2014 मध्ये 25 कोटी इंटरनेट जोडण्या होत्या, ती संख्या यावर्षीच्या जूनमध्ये 83 कोटींवर गेली आहे. तर याच कालावधीतील ब्रॉडबँड कनेक्शनमध्ये तब्बल 12 पट वाढ (सहा कोटींवरून 79 कोटी) झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

European Union Warning: युद्ध थांबले तरी इंधन महागच राहणार; युरोपीय महासंघाचा इशारा, ‘विंडफॉल टॅक्स’ लागू होण्याची शक्यता!

Washim News: फसव्या लिंकमुळे बँक खाती होताहेत रिकामी; सायबर फसवणुकीचे प्रकार वाढले; नागरिकांनी सजग राहण्याची गरज

Chhatrapati Sambhajinagar Student Death : काळाचा घाला! परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले; जागीच मृत्यू झाल्याने हळहळ

IPL 2026: आधी KL Rahul, आता रिषभ पंत! संजीव गोएंका यांनी पुन्हा कर्णधाराला झापलं? X पोस्ट करत म्हणाले, LSG ची कहाणी...

Jalgaon Accident News: दोन दुचाकींचा अपघात; एक ठार, तिघे जखमी; १ ठार, ३ गंभीर जखमी; पोलिसांनी गुन्हा नोंदवला

SCROLL FOR NEXT