delhi terrorism main.jpg
delhi terrorism main.jpg 
देश

ब्रेकिंग न्यूज ! दिल्लीत पोलिसांची मोठी कारवाई, 5 दहशतवाद्यांना अटक

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई करत लक्ष्मीनगरमधील शकरपूर परिसरात चकमकीनंतर 5 संशयितांना अटक केली आहे. यापैकी दोघे पंजाब तर तिघे जण काश्मीरमधील असल्याचे सांगितले जात आहे. अटक करण्यात आलेल्या संशयितांचे दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे आढळून आल्याचे विशेष पथकाचे डीसीपी प्रमोद कुशवाह यांनी सांगितले. त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. 

अटक करण्यात आलेल्या 5 जणांना नार्को टेररिझमसाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने पाठिंबा दिला होता. हे संशयित कोणत्या दहशतवादी संघटनेशी निगडीत होते, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे कुशवाह यांनी सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीर्घकाळ चाललेल्या ऑपरेशननंतर या दहशतवाद्यांना अटक केली. काही दिवसांपूर्वी पंजाबमधील शौर्य पदक विजेते बलविंदर सिंग यांची हत्या ज्यांनी केली होती. त्यातील एक जणाचाही यामध्ये समावेश असू शकतो. 

पूर्व दिल्लीतील लक्ष्मी नगर (शकरपूर) परिसरात दिल्ली पोलिसांच्या विशेष पथक आणि संशयितांमध्ये चकमक उडाली. त्यानंतर या पाच जणांना अटक करण्यात आली. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, एकूण 13 राऊंड गोळीबार झाला. विशेष पथकाकडून तपास केला जात आहे. अटक केलेल्या संशयितांची कसून चौकशी केली जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT